Due to land disputes, 9 people were killed by firing | खळबळजनक! जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून ९ जणांची हत्या
खळबळजनक! जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून ९ जणांची हत्या

ठळक मुद्देजमीन वाद-विवादाची ही घटना बुधवारी (१७ जुलै ) दुपारच्या सुमारास घडली.  मृतांमध्ये तीन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.

लखनौ - जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून ९ जणांची करण्यात आली  आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीचा वाद सोडवण्यास प्रशासनाला अपयश आलं. मात्र, यानंतर दोन गटांत झालेल्या वादातून ९ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. शिवाय यामध्ये १२ हून अधिक जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांत पेटलेल्या वादादरम्यान एका गटानं केलेल्या गोळीबारात दुसऱ्या गटातील बरेच जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. जमीन वाद-विवादाची ही घटना बुधवारी (१७ जुलै ) दुपारच्या सुमारास घडली.  या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 
 


Web Title: Due to land disputes, 9 people were killed by firing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.