शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

अनैतिक संबंधात अडचण असलेल्या पतीची पत्नीकडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 8:31 PM

अनमोड खून प्रक़रणात चौघांना अटक; डॉक्टरकडे नेण्याचा बहाणा करुन आणले गोव्यात

ठळक मुद्देया प्रकरणात कुळे पोलिसांनी मयताची पत्नी लक्ष्मी हिचा प्रियकर सुरेश पुजार यांच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे. मयताची ओळख पटत नसल्यामुळे हा खूनाचा प्रकार उघडकीस येऊ शकला नव्हता.

मडगाव - मागच्या महिन्यात अनमोड घाटात सगनगौडा याचा केलेला खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. पतीची पत्नी लक्ष्मी हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणात कुळे पोलिसांनी मयताची पत्नी लक्ष्मी हिचा प्रियकर सुरेश पुजार यांच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे.दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अटक केलेल्या अन्य दोन संशयितांची नावे जगदीश कलप्पा चलवाडी व मुथप्पा सिद्धप्पा अनावलड असे असून ज्या गाडीतून मयत सगनला गोव्यात आणले होते ती गाडीही गदग येथून जप्त केली आहे.गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आपल्या प्रेम प्रकरणात पतीचा अडथळा येत असल्यामुळेच हा खून करण्यात आला. प्रथम त्याला दारुतून विष पाजण्यात आले व नंतर नायलॉन दोरीने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. हा मृतदेह अनमोडच्या जंगलात फेकून दिला होता. एका महिन्यापूर्वी कुळे पोलिसांना तो सापडला होता. मात्र मयताची ओळख पटत नसल्यामुळे हा खूनाचा प्रकार उघडकीस येऊ शकला नव्हता.पोलिसांच्या माहितीप्रमाणे, मयत सगन हा सतत आजारी असायचा. दरम्यानच्या काळात त्याची पत्नी लक्ष्मी हिचे अनैतिक संबंध सुरेशशी जुळले होते. एका दिवशी त्या दोघांनाही सगनने नको त्या अवस्थेत पाहिले होते. त्यानंतर मयत व त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते. आपल्या प्रेम प्रकरणात सगनचा अडथळा येत असल्यामुळे त्या दोघांनीही त्याचा काटा काढण्याचा ठरविले. तुमच्यावर औषधोपचार करण्यासाठी आम्ही तुम्हाला गोव्यात घेऊन जातो असे सांगून पत्नीने इतर साथीदारांच्या सहाय्याने त्याला गाडीत घालून गदगहून गोव्यात आणले. मयताला दारु पिण्याचे व्यसन होते. त्या दिवशी त्याला दारुतून विष पाजण्यात आले. नंतर अनमोडला पोहोचल्यानंतर सर्व संशयितांनी नायलॉन दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. नंतर तो गतप्राण झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह झाडीत फेकून दिला. दोन दिवसांपूर्वी कुळे पोलिसांना मयताची ओळख पटली होती. त्यानंतर लगेच तपासाची चक्रे हलली. कुळे पोलिसांनी त्वरित गदगला जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक