Drunken stunts! Wrap the wire and hit the stunts and broke the legs | नशेबाजाचा स्टंट! वायरला लटकून स्टंट मारायला गेला आणि पाय मोडून आला 

नशेबाजाचा स्टंट! वायरला लटकून स्टंट मारायला गेला आणि पाय मोडून आला 

मुंबई - पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या बाबुराव शेट्ये चौकनजीक असलेल्या कोलंबो जंक्शन येथे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक चित्तथरारक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे अनेकांचे काळजाचे ठोके चुकले असतील. जावेद अश्रफ अली (वय ३८) या इसमाने नशेच्या धुंदीत स्टंट करत जे. जे. फ्लायओव्हरपासून ते समोरील इमारतीस जोडलेल्या वायरल लटकून स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. याबाबत अधिक माहिती देताना पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविशन कानडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जावेद हा नशा करणारा असून या घटनेत तो सुदैवाने बचावला आहे. त्याच्या दोन्ही पायांना आणि एका उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून जी. टी. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अद्याप तरी गुन्हा दाखल केलेला नसल्याचे कानडे यांनी सांगितले.     

Web Title: Drunken stunts! Wrap the wire and hit the stunts and broke the legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.