शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! दारूच्या नशेत मुलाने केला 75 वर्षीय आईवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 19:56 IST

Crime News : धक्कादायक बाब म्हणजे नशेत घरी आलेल्या आरोपीने आपल्या पत्नी आणि सूनेसमोरच आईवर अत्याचार केला.

आग्रा - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या 75 वर्षीय आईवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नशेत घरी आलेल्या आरोपीने आपल्या पत्नी आणि सूनेसमोरच आईवर अत्याचार केला. आरोपीच्या सूनेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीकरी या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. 45 वर्षीय अमर सिंह हा पत्नी, मुलगा आणि सूनेसोबत राहत आहे. अमर सिंह रोज दारू पिऊन घरी येत असे. बुधवारी रात्री अमर सिंह याचा मुलगा घरात नव्हता. त्याचवेळी अमर सिंह हा दारू पिऊन घरी आला. तो खोलीत गेला आणि आईवर बलात्कार केला. आईने आरडाओरड केल्यानंतर अमर सिंहची पत्नी आणि सून मदतीसाठी धावून गेली. मात्र खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्या काही करू शकल्या नाहीत. 

लज्जास्पद प्रकारानंतर सूनेने लगेचच पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात़डीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी अमर सिंह याला ताब्यात घेतले. आरोपीची पत्नी आणि सून या दोघी पीडितेला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"पीडिता संध्याकाळी एकटीच घराबाहेर गेली नसती तर अशी घटना घडलीच नसती"

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला व तिची हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसविण्यात आली. याप्रकरणी एका पुजाऱ्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महिलेने कोणाच्याही प्रभावाखाली एकटं बाहेर पडायला नको होतं. पीडित महिला संध्याकाळी एकटीच बाहेर गेली नसती तर अशी घटना घडली नसती असं चंद्रमुखी यांनी म्हटलं आहे. 

चंद्रमुखी देवी यांच्या या वादग्रस्त विधानवरून अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जोरदार टीका केली आहे. मात्र टीकेचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतले आहे. तसेच विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी बदायूंमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीयांची भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रमुखी यांनी महिलांनी कोणत्याही वेळी घराबाहेर पडू नये. पीडिता संध्याकाळच्या वेळी एकटी बाहेर गेली नसती तर ही घटना घडली नसती असं म्हटलं. 

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस