Drugs supply to celebrities from Ejaz Khan? Inquiry from NCB | एजाज खानकडून सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवठा? एनसीबीकडून चौकशी

एजाज खानकडून सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवठा? एनसीबीकडून चौकशी

मुंबई : ड्रग्ज माफियाशी कनेक्शन प्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण कक्षने (एनसीबी) अटक केलेल्या अभिनेता एजाज खान हा बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्याबाबत त्याच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओटीटी प्लँटफॉर्मच्या लॉंचिंग कार्यक्रमामध्ये त्याचा वापर करण्यात आला होता का, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Drugs supply to celebrities from Ejaz Khan? Inquiry from NCB)

ड्रग्ज माफिया फारूख बटाटा व त्याचा पुत्र आरिफबरोबर असलेल्या ड्रग्ज तस्करीसंबंधी एनसीबीने मंगळवारी रात्री एजाज खानला अटक केली आहे. त्यापूर्वी सुमारे आठ तास कसून चौकशी करण्यात आली होती. एजाजला तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे. त्याच्या माध्यमातून अंमलीपदार्थ चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींना पुरवित असल्याचा संशय आहे. त्यानुषंगाने त्याच्याकडून माहिती घेण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी एका ओटीटी प्लॅटफॉर्मचे लाँचिंग मोठ्या दिमाखात झाले होते. त्या पार्टीला काही रशियन कलाकारांनी हजेरी लावली होती. एजाज खानही त्यामध्ये सहभागी होता,

Web Title: Drugs supply to celebrities from Ejaz Khan? Inquiry from NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.