शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

मानखुर्द, कुर्ला आणि पवई येथून ड्रग्ज जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 15:02 IST

मानखुर्द आणि कुर्ला, पवई परिसरात कारवाई करत गांजा व एमडीचा साठा जप्त केला. या कारवाईत 4 ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्देदोघांच्या अंगझडतीत 2 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.तिच्याकडे व खाली लपविलेल्या पिशविमध्ये एकूण 2 किलो गांजा आढळून आला. तसेच २,३५,८३०/- रोख रक्कम पोलिसांना सापडली. 

मुंबई - पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबोलीत धडक कारवाई केल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकांनी मानखुर्द आणि कुर्ला, पवई परिसरात कारवाई करत गांजा व एमडीचा साठा जप्त केला. या कारवाईत 4 ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार घाटकोपर युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवडीकर, उपनिरीक्षक चारू चव्हाण आणि पथक मानखुर्द परिसरात गस्त घालत असताना पथकाला रामकृष्णा मूपनार (45) आणि अर्जुन विलास रेठे (34) या दोघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांच्या अंगझडतीत 2 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. तर वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत व त्यांच्या पथकाने कुर्ला एलबीएस मार्गावरील इंद्रा नगरात कारवाई केली. पोलिसांनी नफिस सुलेमान खान (49) हा ड्रग्ज पेडलरला 21 ग्रॅम वजनाच्या एमडीसह रंगेहाथ पकडले.

पवई येथील मोरारजी नगर परिसरात पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेली गांजा विक्री करणारी महिला विक्रेती अजगरीबेगम सैयद अली (65) ही तिच्या घरासमोर असलेल्या प्लास्टिक पिशवीतून काहीतरी विक्री करत असताना पोलिसांना दिसली. त्यावेळी संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी तिच्या पिशवीची झडती घेतली असता तिच्याकडे व खाली लपविलेल्या पिशविमध्ये एकूण 2 किलो गांजा आढळून आला. तसेच २,३५,८३०/- रोख रक्कम पोलिसांना सापडली. 

टॅग्स :Anti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकPoliceपोलिसArrestअटक