शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कुख्यात कडवचा वाहनचालक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:24 AM

राजकीय घोंगडे पांघरुण गुन्हेगारी करणारा कुख्यात गुंड मंगेश कडव अद्यापही फरारच आहे. मात्र त्याच्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वृत्त लिहिस्तोवर त्याची कसून चौकशी सुरू होती.

ठळक मुद्देपोलिसांकडून कसून चौकशी : जागोजागी शोध

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राजकीय घोंगडे पांघरुण गुन्हेगारी करणारा कुख्यात गुंड मंगेश कडव अद्यापही फरारच आहे. मात्र त्याच्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वृत्त लिहिस्तोवर त्याची कसून चौकशी सुरू होती.मंगेश कडवविरुद्ध तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून, आणखी चार तक्रारदार पोलिसांकडे पोहोचले आहेत. त्यांची कागदपत्रे तपासून कडवने त्यांची कशाप्रकारे फसवणूक केली, त्याची पोलिस चौकशी करीत आहेत. दुसरीकडे कडवला शोधण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके कामी लागली आहेत. ही पथके त्याचा जागोजागी शोध घेत आहेत.फरार असलेल्या कडवने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र आज शनिवारी त्याच्या वकिलांनी अर्ज मागे घेतल्याने तो आता आत्मसमर्पण करू शकतो, असे बोलले जात आहे. दरम्यान, फरार असलेला कडव त्याची मालमत्ता आणि अवैध मालमत्तेची कागदपत्रे साथीदारांच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धडपडत असल्याची सूत्रांची माहिती आहे.पोलिसांच्याही कानावर हे वृत्त आले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कडवचा विश्वासू वाहनचालक आकाश वानखेडे याला शनिवारी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू होती. कडवची आणखी किती वाहने आहेत आणि तो कुठे कुठे असू शकतो, तो नेहमी कुठे जायचा, याबाबत वाहनचालकाला विचारपूस केली जात आहे. कडव नेहमी या वाहनचालक वानखेडेला इकडे-तिकडे घेऊन जात होता. त्यामुळे त्याच्याकडून कडवचा धागादोरा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कडव याच्या विरोधातील गट सक्रिय झाला असून, त्याचा पत्ता शोधून देण्यासाठीही या गटातील मंडळीसुद्धा धावपळ करीत असल्याची माहिती आहे.लाल मर्सिडिज गायबकडवकडे अनेक आलिशान वाहने आहेत. त्यापैकी पोलिसांनी १७ लाखांची हार्ले डेव्हिडसन ही दुचाकी आणि ४५ लाखाची मर्सिडिज तसेच अन्य काही वाहने जप्त केली. मात्र त्याच्याकडे एक लाल रंगाची मर्सिडिज कार असून, गुन्हा दाखल झाल्यापासून मंगेशसोबत ती कारही कुणाला दिसलेली नाही. त्यामुळे या कारमध्येच राहून मंगेश कडव इकडे-तिकडे लपत फिरत असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणीArrestअटक