शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले; अश्लील व्हिडिओ बनवून १ कोटी मागितले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 8:25 PM

Honeytrap : श्रीमंत व्यक्तीला ब्लॅकमेल करणाऱ्या हनीट्रॅपचा पर्दाफाश

ठळक मुद्देमहिलेसह तिच्यासाठी साथीदारास अटक; एक कोटीची मागितली होती खंडणीअमोल सुरेश मोरे (30 रा. कायनेटिक चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या सदर महिलेच्या साथीदाराचे नाव आहे.

अहमदनगर - श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्लील व्हीडीओ बनवत एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदारास नगर तालुका पोलिसांनी शनिवारी जेरबंद केले.

अमोल सुरेश मोरे (30 रा. कायनेटिक चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या सदर महिलेच्या साथीदाराचे नाव आहे. नगर तालुक्यातील जखणगाव येथे 30 वर्षीय आरोपी महिला एकटीच राहते. तिने नगर तालुक्यातील एका श्रीमंत व्यावसायिकास शरीरसंबंधाचे आमिष दाखवून 26 एप्रिल रोजी घरी बोलाविले. या वेळी सदर व्यावसायिकास शरीरसंबंध करण्यास भाग पाडून अमोल मोरे यांच्या मदतीने त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. व्हिडीओ तयार होताच आरोपींनी आम्हास एक कोटी रुपये आणून दे नाहीतर सदर व्हिडिओ हा पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. यावेळी आरोपींनी त्या व्यावसायिकास दोरीने बांधून मारहाण करून त्याच्याकडील 5 तोळे वजनाची सोन्याची चैन, चार अंगठ्या व रोख रक्कम 84 हजार रुपये असा एकूण 5 लाख 44 हजार 300 रुपयेचा मुद्देमाल हिसकावून घेतला. या घटनेनंतर घाबरून गेलेल्या सदर व्यावसायिकाने सुरुवातीस मौन बाळगले मात्र सदर महिलेचा त्रास असह्य झाल्यानंतर त्याने नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर सानप यांच्या पथकाने शनिवारी सकाळीच जखणगाव येथून सदर महिलेला अटक केली तर अमोल मोरे याला कायनेटिक चौक येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

 सदर महिलेने व्यवसायिकाकडून हिसकावून घेतलेली चैन तिने भिंगार अर्बन बँक येथे तिच्या भावाच्या नावाने गहाण ठेवली होती. झडती दरम्यान पोलिसांनी सदर महिलेच्या घरातून गुन्ह्यातील एक अंगठी व रोख 69 हजार 300 रुपये जप्त केले आहेत. तसेच अमोल मोरे याच्याकडून 15 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व पथकातील उपनिरीक्षक आर.एन. राऊत, हेडकोन्स्टेबल बापुसाहेब फोलाणे, भगवान गांगडे, शैलेष सरोदे, संतोष लगड, योगेश ठाणगे, अशोक मरकड, धर्मनाथ पालवे, प्रमीला गायकवाड, धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, गायत्री धनवडे, मोहीनी कर्डक, राजश्री चोपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

महिलेच्या जाळ्यात अनेक जण अडकल्याची शक्यतासदर महिला व तिचा साथीदार अमोल मोरे यांनी हनीट्रॅपच्या माध्यमातून अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे लाटल्याचा पोलिसांचा संशय आहे. अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी भीती न बाळगता नगर तालुका पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसArrestअटकExtortionखंडणीWomenमहिला