Dr. Sheetal Amte Suicide : नागपूरचे फॉरेन्सिक पथक डॉ. शीतल आमटेंच्या घरी दाखल, पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु 

By पूनम अपराज | Published: November 30, 2020 07:19 PM2020-11-30T19:19:17+5:302020-11-30T19:21:24+5:30

Dr. Sheetal Amte Suicide : हायप्रोफाईल केस असल्याने उत्तरीय तपासणीसाठी डॉ शीतल आमटे-करजगी यांचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला आहे.

Dr. Sheetal Amte Suicide: Nagpur Forensic team Entered the house of Dr. Sheetal Amte, started trying to find evidence | Dr. Sheetal Amte Suicide : नागपूरचे फॉरेन्सिक पथक डॉ. शीतल आमटेंच्या घरी दाखल, पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु 

Dr. Sheetal Amte Suicide : नागपूरचे फॉरेन्सिक पथक डॉ. शीतल आमटेंच्या घरी दाखल, पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु 

googlenewsNext
ठळक मुद्दे फॉरेन्सिकची टीम त्यांच्या घरात काही तांत्रिक पुरावे मिळतात का हे पाहत आहेत, असे पुढे पांडे यांनी सांगितले. 

प्रवीण खिरटकर / पूनम अपराज 

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल  आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. वरोरा पोलिसांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. नागपूरहून फॉरेन्सिकचे पथक दाखल झाले असून ते घटनस्थळी तपासणी करत असल्याची माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले. 


या प्रकरणी घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नाही. नागपूरची फॉरेन्सिक टीम सध्या तपास करीत आहे. डॉ. शीतल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात असून रुग्णालयाकडून तासाभरात शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे हे स्पष्ट होईल. अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याचे चंद्रपूरचे पोलीस उपाधीक्षक निलेश पांडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. झोपेच्या गोळ्या घेऊन की विषारी इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे का ? याबाबत आता निष्कर्ष काढू शकत नाही. ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर उघड होईल. यावर आताच वक्तव्य करणं चुकीचं ठरेल, तसेच मृतदेह आनंदवन येथील त्यांच्या रहात्या घरी बेडरूममध्ये आढळून आला. फॉरेन्सिकची टीम त्यांच्या घरात काही तांत्रिक पुरावे मिळतात का हे पाहत आहेत, असे पुढे पांडे यांनी सांगितले. 

कोरोनाकाळात शीतल आमटे यांनी कोविड योद्धा म्हणून केलं होतं काम

 

Dr. Sheetal Amte Suicide: डॉ. शीतल आमटेंनी केले होते गंभीर आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 

मात्र, डॉ. शीतल आमटे यांनी  स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. शीतल आमटे- करजगी या डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळावर आहेत. शीतल या ३९ वर्षांच्या होत्या. त्यांना शर्विल नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे.

 

Dr. Shetal Amte Suicide : आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं हा होता डॉ. शीतल आमटेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प 

 

हायप्रोफाईल केस असल्याने उत्तरीय तपासणीसाठी डॉ शीतल आमटे-करजगी यांचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला आहे.

Web Title: Dr. Sheetal Amte Suicide: Nagpur Forensic team Entered the house of Dr. Sheetal Amte, started trying to find evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.