Dr. Sheetal Amte Suicide : लॅपटाॅप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 09:20 PM2020-12-01T21:20:41+5:302020-12-01T21:22:24+5:30

Dr. Sheetal Amte Suicide : औषधी व रिकाम्या सिरीन जप्त

Dr. Sheetal Amte Suicide: Laptops, mobiles, CCTV footage investigated by cyber crime | Dr. Sheetal Amte Suicide : लॅपटाॅप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी

Dr. Sheetal Amte Suicide : लॅपटाॅप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी

Next
ठळक मुद्देसोेमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास डाॅ. शीतल आमटे या घरात बेशुद्धावस्थेत आढळल्या.शीतल आमटे यांनी मानसिक तणावातून स्वत:चे आयुष्य संपविल्याचेही बोलले जात आहे. त्यांना हा मानसिक तणाव नेमका कशाचा होता, ही बाब अद्याप अनुत्तरीत आहे. याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान चंद्रपूर पाेलिसांपुढे आहे.

वरोरा (चंद्रपूर) - कर्मयोगी बाबा आमटे यांची नात आणि डाॅ. विकास आणि भारती आमटे यांची कन्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या होऊन २४ तासांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी पोलिसांच्या हाती अद्याप कुठलाही ठोस पुरावा लागला नाही. पोलीस यंत्रणा या घटनेचा उलगडा करण्यात व्यस्त आहे. दरम्यान डाॅ. शीतल आमटे यांच्या आनंदवनातील कार्यालयातील लॅपटाॅप, २ मोबाईल, संगणक यासह औषधी व रिकाम्या सिरीन हेसाहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय कार्यालयात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेतले आहे. याची तपासणी सायबर क्राईमच्या मार्फतीने सुरू केेलेली आहे. यामाध्यमातून काय उलगडा होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.


सोेमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास डाॅ. शीतल आमटे या घरात बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांचे पती गौतम करजगी यांनी त्यांना लगेच वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांनी विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. मात्र अद्याप डाॅ. शीतल आमटे -करजगी यांचा मृत्यूच्या नेमक्या कारणांचा उलगडा झालेला नाही. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घटनास्थ‌ळाचा पंचनामा केला. मात्र त्यांना कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्याचे तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांनी सांगितले. दरम्यान, डाॅ. शीतल आमटे यांच्या कार्यालयातील लॅपटाॅप, त्यांचा मोबाईल, औषधी व रिकाम्या सिरीनही ताब्यात घेतल्या आहे. यामाध्यमातून तपासाची दिशा मिळण्याची आशा डाॅ. निलेश पांडे यांनी ‌‘लोकमत’जव‌ळ व्यक्त केली. डाॅ. शीतल आमटे यांनी मानसिक तणावातून स्वत:चे आयुष्य संपविल्याचेही बोलले जात आहे. त्यांना हा मानसिक तणाव नेमका कशाचा होता, ही बाब अद्याप अनुत्तरीत आहे. याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान चंद्रपूर पाेलिसांपुढे आहे.
 

Dr. Sheetal Amte Suicide: डॉ. शीतल आमटेंनी केले होते गंभीर आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 

आमटे कुटुंबीयांना जबर धक्का

डाॅ. शीतल आमटे आमटे कुटुंबीयांतील एकुलती एक मुलगी होती. तिच्या अचानक मृत्यूचा आमटेे कुटुंबीयांना जबर धक्का बसला असल्याची माहिती आहे. डाॅ. शितल ही डाॅ. विकास व भारती आमटे यांची मुलगी. त्यांना कौस्तुभ हा मुलगा आहे. तर डाॅ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना दिगंत आणि अनिकेत ही दोन मुले आहे. डाॅ. शीतल आमटे ही आमटे कुटुंबातील एकुलती एक लाडकी लेक होती. परंतु, नंतरच्या काळात डाॅ. शीतल आमटे ही एकांगी पडल्याचे आनंदवनातील मागील काही महिन्यातील घटनाक्रमावरून लक्षात येते. ती टोकाचे पाऊल उचलतील, असे कुणालाही वाटत नव्हते. तिच्या या निधनाने आनंदवनाचा आनंदच हिरावल्याच्या भावना समाज मनात व्यक्त होत आहे.

Dr Sheetal Amte Sucide News : धक्कादायक! आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

 

नाना पाटेकरांकडून आमटे कुटुंबीयांचे सांत्वन

डाॅ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटामुळे सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आमटे कुटुंबीयांनी अतिशय जवळचे नाते निर्माण झाले होते. तेव्हा ते आमटे कुटुंबीयांच्या सुख-दु:खात सहभागी व्हायचे. डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूची वार्ता त्यांना कळताच त्यांनाही जबर धक्का बसला. नाना पाटेकर यांनी ऋणानुबंधातून आमटे कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केल्याची माहिती आहे. मात्र याबाबीला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.


आमटे कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर आमटे कुटुंबीय शोकमग्न अवस्थेत आहे. आपल्या लेकीने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेबद्दल आमटे कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title: Dr. Sheetal Amte Suicide: Laptops, mobiles, CCTV footage investigated by cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.