कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांड; पत्नी व मुलाचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:20 PM2019-11-14T12:20:46+5:302019-11-14T12:25:38+5:30

खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

Double murder from family feuds in Majalgaon; Husband attempts suicide by murdering wife and child | कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांड; पत्नी व मुलाचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांड; पत्नी व मुलाचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देशेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून मागील दोन तीन दिवसांपासून पती-पत्नीत भांडण सुरू होते.

माजलगाव (जि. बीड ) : तालुक्यातील मोगरा या गावानजीक असलेल्या रामनगर तांडा येथे शेतात कापूस वेचत असलेल्या पत्नी व मुलाचा गळा आवळून व चाकूने वार करून खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या हातावर व पोटात चाकूचे वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.

रामनगर तांड्यावरील रहिवासी बंडू उत्तम जाधव (४) हा आपल्या कुटुंबासह शेतात कापूस वेचत होता. त्यावेळी अचानक बंडू जाधव याने त्याची पत्नी गंगा (३१) हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. नंतर तो तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या मुलगा करण (९) आणि मुलगी पूजा (११) यांच्याकडे गेला.मुलीला पैसे देऊन त्याने गावात जायला सांगितले. नंतर मुलाला घेऊन तो पत्नीला मारलेल्या ठिकाणी आला. तेथे बंडूने मुलाचा देखील गळा आवळून खून केला. त्यानंतर जवळील चाकूने त्या दोघांवर पोटात चाकूने वार करून स्वत:च्या पोटात आणि हातावर वार करून घेतले. तितक्यात आजूबाजूच्या शेतात काम करणारे घटनास्थळी धावले. स्वत:वर वार करून तडफडत असलेल्या बंडूने जीव जात नसल्याने जवळच असलेल्या रोहित्राकडे धाव घेतली. त्याचा जोरदार धक्का बसल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन पडला.

एकच हल्लकल्लोळ माजल्यानंतर जमलेल्या लोकांनी बंडूला उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रु ग्णालयात पाठवले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यास बीड येथील जिल्हा रु ग्णालयात त्यास रेफर करण्यात आले आहे. दरम्यान कापूस वेचत असताना नेमके काय घडले याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात पाठवले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. नातेवाईकांनी ग्रामीण रु ग्णालयात एकच गर्दी केली होती.
 

...म्हणून मुलगी वाचली
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंडू व त्याची पत्नी गंगा यांच्यामध्ये मागील दोन तीन दिवसांपासून भांडण सुरू होते. यातूनच हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा परिसरात होती. ९ वर्षांच्या निष्पाप करण जाधवचा यात काय दोष असे म्हणत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. पत्नीच्या हत्येनंतर मुलीला स्वत: बंडुने गावात पाठविल्याने तिचे प्राण वाचले.

Web Title: Double murder from family feuds in Majalgaon; Husband attempts suicide by murdering wife and child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.