शहरं
Join us  
Trending Stories
1
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
2
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
3
“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ
4
दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली तरुणी; FB वर सुरू झाली लव्हस्टोरी
5
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
6
INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज
7
परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल
8
३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!
9
SBI चा ग्राहकांना तगडा झटका, मासिक EMI वाढणार! MCLR च्या दरात 10 बेसिस प्वाइंट्सची वाढ 
10
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
11
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
12
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
13
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
14
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
15
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
16
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
17
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
18
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
19
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
20
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...

दो बंडल मशीन मे मत डालो अंकल, नोट फस जयेगी'! बोलण्यात गुंतवत वृद्धाला ९९ हजारांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 6:08 PM

Crime News : याप्रकरणी कुरार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने बुधवारी दोघांच्या मुसक्या आवळत एक कार आणि रोख रक्कम हस्तगत केली असुन यांच्यावर घाटकोपर पोलिसातही गुन्हे दाखल असल्याचे समजते.

ठळक मुद्देरमेश देवणगाव (३२) आणि फिरोज पठाण (३५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मुंबई - एटीएममध्ये पैसे भरत असताना ' दो बंडल मशीन मे मत डालो अंकल,नोट फस जयेगी', असे सांगत मदतीचा आव आणुन वृद्धाला ९९ हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने बुधवारी दोघांच्या मुसक्या आवळत एक कार आणि रोख रक्कम हस्तगत केली असुन यांच्यावर घाटकोपर पोलिसातही गुन्हे दाखल असल्याचे समजते.

रमेश देवणगाव (३२) आणि फिरोज पठाण (३५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. देवणगाव हा व्यवसायाने चालक तर पठाण हा चिकनविक्री करणारा दुकानदार आहे.  तक्रारदार किशोरीलाल बिस्सा (६०) हे एका पतंजली प्रोडक्टच्या दुकानाचे मालक गौरव कनोडिया यांच्याकडे कलेक्शन आणि बँकेच्या व्यवहारांचे काम पाहतात. ते ७ जुलै, २०२१ रोजी गोरेगावच्या दिंडोशी येथील बँक ऑफ इंडिया येथे एटीएम मशीनमध्ये कनोडिया यांनी दिलेले ९९ हजार रुपये एटीएममार्फत खात्यात भरण्यासाठी गेले होते. पैसे भरताना त्यांनी कंपनीचा खाते क्रमांक टाकला आणि मशीनचे डिपॉझिट डोअर उघडले. त्याच क्षणी एक इसम तिथे आला आणि पैशाचे दोन बंडल एकाच वेळी आत टाकू नका. अन्यथा नोट अडकेल असे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी दोन टप्प्यामध्ये पैसे भरले मात्र त्याच वेळी ५०० ची एक नोट परत आली. ती नोट त्यांनी घेताच मशीनचे शटर बंद झाले मात्र त्याची पावती त्यांना मिळाली नाही. तेव्हा तुमचे पैसे खात्यात  जमा झालेत कधीकधी मशीनमध्ये प्रिंटिंग पेपर नसला की असे होते असे अनोळखी व्यक्तीने त्यांना सांगितले. तसेच पैसे जमा झाल्याची खात्री बँकेत जाऊन करून घ्या असेही सुचविले. त्यानुसार बिस्सा बँकेत गेले आणि बँक मॅनेजरला विचारले तसेच पैसे भरल्याची पावती मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र खात्यात पैसे जमा होतील तुम्ही काळजी करू नका असे मॅनेजरने सांगितल्याने बिस्सा हे ऑफिसला निघुन गेले. मात्र संध्याकाळी गौरव यांनी ऑनलाइन बँक खाते तपासले तेव्हा त्यात पैसे जमा झाले नव्हते. बिस्सा यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आणि त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कारच्या नंबरप्लेटमुळे सापडला आरोपी !कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चाळके, सहायक पोलीस निरीक्षक नाईक आणि पथकाने घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. तेव्हा तिघे जण एका कारमध्ये बसत असल्याचे त्यांना दिसले. त्या कारच्या नंबरप्लेट वरून त्याच्या मालकाला संपर्क करण्यात आला. तेव्हा ती देवळगाव याला दोन वर्षापूर्वी विकल्याचे समजले. त्यानुसार त्याला नवी मुंबईतुन ताब्यात घेत अन्य साथीदाराच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.

टॅग्स :PoliceपोलिसRobberyचोरीArrestअटकCrime Newsगुन्हेगारी