डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर हॅक, दिड कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 19:16 IST2022-03-16T19:16:10+5:302022-03-16T19:16:30+5:30
Dombivli Nagari Bank server hacked : याप्रकरणी बँकेचे संगणक प्रमुख निरंजन राईलकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर हॅक, दिड कोटींची फसवणूक
डोंबिवली: येथील डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे महापे नवी मुंबई येथील सर्व्हर अज्ञात व्यक्तीने हॅक करून सुमारे 1 कोटी 52 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. याप्रकरणी बँकेचे संगणक प्रमुख निरंजन राईलकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी पावणोबारा पुर्वी डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे महापे नवी मुंबई येथील सर्व्हर हॅक करून अथवा सर्व्हरमध्ये बेकायदेशिररित्या प्रवेश करून बँकेच्या डाटा मध्ये फेरफार करून बँकेची 1 कोटी 51 लाख 96 हजार 854 रूपयांची रककम अज्ञात व्यक्तीने परस्पर काढून घेतली. हा प्रकार निदर्शनास येताच संगणक प्रमुख राईलकर यांनी आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्याआधारे कलम 420 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सायबर गुन्हे विभागाकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.