शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

डोंबिवलीत अल्पवयीन मुली असुरक्षितच; एकीचा विनयभंग तर दुसरीचं अपहरण करीत विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 17:47 IST

In Dombivli, minor girls are not safe :क्लासला जाते असे सांगून मुलगी सोमवारी घराबाहेर पडली होती. ती रात्रीपर्यंत घरी न आल्याने तीचा शोधाशोध घेण्यात आला.

ठळक मुद्देअक्षयला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. त्याने तिला त्याच्या भिवंडी येथील रहात्या घरात डांबून ठेवले होते.

डोंबिवली:  एकिकडे सामुहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच दुसरीकडे अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन वेगवेगळया घडलेल्या घटनांमध्ये एका शिकवणी घेणा-या 15 वर्षीय मुलीचा अन्य मुलीच्या पालकाने विनयभंग केला तर इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका 13 वर्षीय फुस लावून तीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमधील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली पश्चिमेत राहणा-या एका 13 वर्षीय मुलीशी भिवंडीत राहणा-या एका तरूणाने इन्स्टाग्रामवर ओळख केली. पुढे चॅटींग करता करता तिच्याशी त्याची मैत्री झाली. अखेर तिला विश्वासात घेऊन तीला फूस लावली आणि तिचे अपहरण केले. दरम्यान याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिस निरिक्षक मोहन खंदारे, पोलिस उपनिरिक्षक घनश्याम बेंद्रे, सहायक पोलिस निरिक्षक गणोश वडणो यांच्या पथकाने कसोशीने तपास करीत या गुन्हयातील आरोपी अक्षय महाडिक याला अटक करीत अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करीत तीला कुटुंबाच्या हवाली केले. क्लासला जाते असे सांगून मुलगी सोमवारी घराबाहेर पडली होती. ती रात्रीपर्यंत घरी न आल्याने तीचा शोधाशोध घेण्यात आला. पण तीचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने अखेर याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे तीचे अपहरण झाल्याची माहीती समोर आली. अक्षयला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. त्याने तिला त्याच्या भिवंडी येथील रहात्या घरात डांबून ठेवले होते. तेथून तीची सुटका करण्यात आली. त्याच्याविरोधात अपहरण, विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे अल्पवयीन मुलगी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. त्या मोबाईलच्या माध्यमातून ती इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह होती. यातूनच तीची ओळख अक्षयशी झाली होती.  सामुहिक बलात्कार प्रकरणातही सोशल मिडीयाचा वापर झाला आहे. त्यामुळे या मिडीयाचा चुकीच्या पध्दतीने वापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.  शिकवणी घेणाऱ्या मुलीचा विनयभंगडोंबिवली पुर्वेतील शिकवणी घेणा-या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पप्पू सहानी याने विनयभंग केल्याची घटना रविवारी रात्री घडली. अल्पवयीन मुलीकडे शिकायला येणा-या एका मुलीचा आरोपी हा बाप आहे. त्या मुलीला घरी सोडण्यासाठी गेली असता पिडीत मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहीती मिळत आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसKidnappingअपहरणArrestअटकInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया