पिंपरी : औंध येथील सर्वोपचार रुग्णालय वसाहतीत अदिती शामसुंदर बिडवे (वय १९, रा. बी बिल्डिंग, रुग्णालय कर्मचारी वसाहत) या तरुणीचा वायरने गळा आवळून खून केला. नंतर आरोपीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. तो मूळचा सिव्हिल हॉस्पिटल क्वार्टर गोदावरी बिल्डिंग लातूर येथील रहिवासी आहे.एका २१ वर्षीय तरुणाने १९ वर्षीय तरूणीचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेईमोदींन बिल्कोसोदीन शहा (वय २१, रा. सिव्हिल हॉस्पिटल क्वार्टर गोदावरी बिल्डिंग लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा लातूरहून औंध रुग्णालय कर्मचारी वसाहतीत आला होता. अदिती यांच्या घरी मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास वायरने गळा आवळून त्याने आदितीचा खून केला. नंतर ओढणीच्या साह्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. याबाबत अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
सांगवीत तरुणीचा गळा आवळून खून, आरोपीनेही केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 12:58 IST
एका २१ वर्षीय तरुणाने १९ वर्षीय तरूणीचा वायरने गळा आवळून खून केला.
सांगवीत तरुणीचा गळा आवळून खून, आरोपीनेही केली आत्महत्या
ठळक मुद्देघटनेमागील कारण अद्याप स्पष्ट आरोपी हा लातूरहून औंध रुग्णालय कर्मचारी वसाहतीत होता आला