शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बापाचे दुष्कृत्य! डॉक्टर वडिलाने पोटच्या मुलीवर केला बलात्कार, विरोध केल्यानंतर केली होती मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 12:00 IST

डॉक्टर आणि त्याच्या भावाला पोलिसांनी गुरुवारी कोर्टात हजर केले, तेथून दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देभोटिया पडव भागातील रुग्णालयाच्या मालकाचे वाराणसी येथील महिला डॉक्टरशी लग्न झाले होते. डॉक्टरांना सात वर्षाची मुलगी आहे.दोघांवरही पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 323, 506, 376 (2) डी -5 एमएनजी -6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका वर्षाच्या तपासणीनंतर उत्तराखंडच्या हल्द्वानी कोतवाली पोलिसांनीबलात्काराच्या आरोपाखाली डॉक्टर आणि त्याच्या भावाला अटक केली. डॉक्टरच्या पत्नीने डॉक्टरने त्याच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याचा आरोप केला होता. डॉक्टर आणि त्याच्या भावाला पोलिसांनी गुरुवारी कोर्टात हजर केले, तेथून दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोटिया पडव भागातील रुग्णालयाच्या मालकाचे वाराणसी येथील महिला डॉक्टरशी लग्न झाले होते. डॉक्टरांना सात वर्षाची मुलगी आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिला डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी डॉक्टरांनी मुलीला वाराणसीहून आणले होते. या काळात डॉक्टराने मुलीवर बलात्कार केला. ही घटना 23 मार्च 2018 रोजीची असल्याचे समजते.

डॉक्टरच्या भावानेही या दुष्कर्मास साथ दिली होती. मुलीने विरोध केल्यानंतर डॉक्टराने मुलीलाही मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरच्या पत्नीने वाराणसीच्या लंका पोलिस स्टेशनमध्ये पती आणि भावाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

हा गुन्हा वाराणसीहून हल्द्वानी कोतवाली येथे पाठविण्यात आला. कोतवालीच्या उपनिरीक्षक गुरविंदर कौर यांनी 6 सप्टेंबर 2019 पासून या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान, जबाब घेण्यासाठी पोलीस अनेक वेळा वाराणसीलाही गेले होते. कोतवाल संजय कुमार म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर आणि त्याच्या भावाला घरातून अटक केली आहे. दोघांवरही पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 323, 506, 376 (2) डी -5 एमएनजी -6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

कुटुंबाचा विरोध असताना लग्न केले, सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या पतीची चाकूने सपासप वार करून केली हत्या 

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक 

टॅग्स :Rapeबलात्कारdoctorडॉक्टरPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदाArrestअटक