Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:35 IST2025-10-29T10:35:00+5:302025-10-29T10:35:39+5:30
महिला डॉक्टरने रुग्णाच्या वडिलांना मारहाण केल्याने वाद निर्माण झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
अहमदाबादच्या सोल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका महिला डॉक्टरने रुग्णाच्या वडिलांना मारहाण केल्याने वाद निर्माण झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, रुग्णाचे वडील आशिक हरिभाई चावडा हे त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात आले होते, परंतु डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.
व्हायरल व्हिडिओमध्ये महिला डॉक्टर पाहायला मिळत आहे. मुलीचे वडील फोनवर व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचं पाहून डॉक्टर संतापली. तुमचा फोन खाली ठेवा असं सांगत होती. यावर मुलीच्या वडिलांनी ठेवणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर डॉक्टरने रुग्णाच्या वडिलांवर हात उचलला, त्यांना मारहाण केली. तसेच सिक्योरिटी गार्ड काहीच करत नसल्याचं म्हटलं. यावरून वाद आणखी वाढला.
No complaint or application has been received at the police station regarding this incident. Upon investigation at the hospital and personally meeting the patient’s relatives, they have refused to file any complaint or application.
— Ahmedabad Police અમદાવાદ પોલીસ (@AhmedabadPolice) October 27, 2025
व्हिडिओमधील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, "तुम्ही गैरवर्तन करत आहात म्हणून मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही." यावर रुग्णाच्या वडिलांनी "आम्ही काय गैरवर्तन केलं?" असा सवाल विचारला. काही लोकांनी डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली. एकाने "अशा घटना पुन्हा घडू नयेत" असं म्हटलं आहे.
काही लोकांनी डॉक्टरची बाजू घेतली आहे. "कदाचित रुग्णाच्या वडिलांनी सुरुवातीला काहीतरी चुकीचं केलं असेल, नियम मोडले असतील आणि डॉक्टरवर दबाव आणला असेल. आपल्याला नेमकं काय घडलं हे माहित नाही" असं एका व्यक्तीने म्हटलं आहे. अहमदाबाद पोलिसांनी या घटनेबाबत कोणीही तक्रार आली नसल्याचं सांगितलं, या व्हिडीओची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.