दुचाकी चोरी प्रकरणी दित्तेश गडेकर, शिवम वेर्णेकर यांना अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: September 14, 2023 17:11 IST2023-09-14T17:11:02+5:302023-09-14T17:11:22+5:30

७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडला चोरीचा प्रकार

Dittesh Gadekar, Shivam Vernekar arrested in two-wheeler theft case | दुचाकी चोरी प्रकरणी दित्तेश गडेकर, शिवम वेर्णेकर यांना अटक

दुचाकी चोरी प्रकरणी दित्तेश गडेकर, शिवम वेर्णेकर यांना अटक

काशीराम म्हांबरे, म्हापसा तळीवाडा: म्हापसा येथे पार्क करुन ठेवण्यात आलेल्या दुचाकीच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली आहे. दित्तेश गडेकर व शिवम वेर्णेकर( राहणार मरड- म्हापसा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.  उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोरीचा प्रकार ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दरम्यान घडला होता.  या संबंधी करण्यात आलेल्या तक्रारीनंतर तपासासाठी विशेष पथकाची स्थापनाही करण्यात आालेली.  पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याच्या आधारावर नंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. रिमांडसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल असेही दळवी म्हणाले.  पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.

Web Title: Dittesh Gadekar, Shivam Vernekar arrested in two-wheeler theft case