प्रवासी भाड्यावरून टॅक्सीचालकांमध्ये वाद; एकावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 04:05 IST2020-06-29T04:04:54+5:302020-06-29T04:05:03+5:30

यात टॅक्सीचालक जुबेर हुसेन खान (२८) जखमी झाला आहे. त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

Disputes between taxi drivers over passenger fares; Fatal attack on one | प्रवासी भाड्यावरून टॅक्सीचालकांमध्ये वाद; एकावर जीवघेणा हल्ला

प्रवासी भाड्यावरून टॅक्सीचालकांमध्ये वाद; एकावर जीवघेणा हल्ला

मुंबई : सायन रुग्णालयाबाहेर प्रवासी नेण्यावरून दोन टॅक्सीचालकांमध्ये झालेल्या वादात एकावर जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी टॅक्सीचालक शाहरुख चौधरीविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात टॅक्सीचालक जुबेर हुसेन खान (२८) जखमी झाला आहे. त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. जुबेर नेहमीप्रमाणे सायन रुग्णालयाबाहेर प्रवाशाची वाट पाहत उभा होता. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. दोघांच्या वादात प्रवासी निघून गेला. त्यामुळे जुबेरला राग आल्याने शाहरुखच्या कानाखाली मारली. आणि तेथून निघून जाण्यास सांगताच शाहरुखने जवळील बियरची तुटलेली बॉटल जुबेरच्या पोटात घुसवली. यात तो गंभीर जखमी झाला. अन्य सहकाऱ्यांनी जुबेरला सायन रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Disputes between taxi drivers over passenger fares; Fatal attack on one

टॅग्स :Policeपोलिस