शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 14:30 IST

Disha Salian Death Case : तिने हा कॉल केलाच नव्हता तर त्यावेळी तिने तिच्या लंडनमधल्या एका मैत्रिणीला कॉल केल्याचे तपासात समोर आलं आहे. यामुळे दिशाच्या मृत्यूप्रकरणात वेगळीच माहिती उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देमृत्यूच्या अगदी काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून १०० हा क्रमांक डायल करून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला होता असा दावा केला जात होता.

सुशांत सिंग राजपूतची माजी असिस्टंट मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक खुलासा मुंबईपोलिसांनी केला आहे. दिशाने मृत्यूपूर्वी १०० या मुंबईपोलिसांच्या मदतकक्षाला फोन केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, तिने हा कॉल केलाच नव्हता तर त्यावेळी तिने तिच्या लंडनमधल्या एका मैत्रिणीला कॉल केल्याचे तपासात समोर आलं आहे. यामुळे दिशाच्या मृत्यूप्रकरणात वेगळीच माहिती उघडकीस आली आहे.मृत्यूच्या अगदी काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून १०० हा क्रमांक डायल करून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला होता असा दावा केला जात होता. मात्र, दिशाने १०० क्रमांकावर फोन केलाच नव्हता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांना फोन केल्यानंतर दिशाने सुशांतला फोन केला असा दावा भाजपच्या एका नेत्याने केला होता. दिशाने पोलिसांना आणि सुशांतला फोन करून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडलं आहे आणि जीव धोक्यात आहे असं सांगितलं होतं, अशी चर्चा होती. मात्र, मुंबई पोलिसांनी हा दावा खोडून काढला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सत्य शोधले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आणि दिशाच्या आई-वडीलांची यासंबंधी चौकशी केली असता ही एक फक्त कथित गोष्ट आहे असं काहीही घडलं नसल्याचं समोर आलं आहे. तपासानंतर १ जून ते ८ जून या कालावधीत दिशाच्या मोबाइल फोनवरून मुंबई पोलिसांना कोणताही फोन आलेला नाही. त्याचप्रमाणे सुशांतलाही फोन केला नाही. मृत्यूआधी तिने मैत्रीण अंकिता हिला कॉल केला होता. ८ जूनला मालाड येथील ती राहत असलेल्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याबाबत अपमृत्यूची मालवणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

 

सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र 

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याMumbaiमुंबईPoliceपोलिस