घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 16:06 IST2021-06-06T16:05:27+5:302021-06-06T16:06:45+5:30

Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा तालुक्यातील एका गावात घडली.

Disgusting ... The son abused the his mother in Buldhana | घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार

घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार


पिंपळगाव सराई: वयोवृद्ध आईवरच ४५ वर्षीय व्यक्तीने अत्याचार करून पळ काढल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलिस ठाण्यातंर्गतच्या एका गावात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.  नात्यालाच काळीमा फासल्याचा या घटनेनंतर आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

पीडित महिला ही ५ जून रोजी आपल्या घरी रात्री झोपलेली असताना तिच्या ४५ वर्षीय मुलाने रात्री बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेने रायपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. रायपूर ठाणेदार सुभाष दुधाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत तायडे, पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, शेख कय्यूम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सध्या आरोपी मुलगा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे आई आणि मुलामधील पवित्र व वात्सल्याच्या नात्याला मात्र डाग लागला आहे. सहा जून रोजी पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पीडित महिलेची बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

Web Title: Disgusting ... The son abused the his mother in Buldhana