शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग पतीला विहिरीत ढकलले; पत्नीला अटक, खुनाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 11:16 IST

भवरखेडा ता.धरणगाव येथील ही खळबळजनक घटना तब्बल दहा दिवसांनी उघडकीस आली.

- भगीरथ माळी

धरणगाव (जि. जळगाव) : मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने दिव्यांग पतीला शेतात नेत विहिरीत ढकलून देत त्याचा खून केला. याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. तिने खुनाची कबुली दिली आहे. भवरखेडा ता.धरणगाव येथील ही खळबळजनक घटना तब्बल दहा दिवसांनी उघडकीस आली.

प्रकाश यादव धोबी (सुर्यवंशी) (वय ३६,  रा. भवरखेडा ता. धरणगाव), असे मृत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी अर्जुन शिवाजी धोबी (रा. भवरखेडा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश धोबी हिने पती प्रकाश यास तिच्या मार्गातील अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाच्या मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने नेले. 

नंतर पतीचा दिव्यांगत्वाचा फायदा घेवून त्याला विहिरीत ढकलून दिले. ही घटना १२ रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी