शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

जेवणाची पार्टी जीवावर बेतली : भरधाव जिप्सी उलटून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 7:42 PM

वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाब्यावर पार्टी करायला गेलेल्या युवक-युवतींची जिप्सी गौसी मानापूर शिवारात उलटली. यात एका युवकाचा मृत्यू झाला तर काही जण किरकोळ जखमी झाले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गौसी मानापूर शिवारातील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (हिंगणा) : वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाब्यावर पार्टी करायला गेलेल्या युवक-युवतींची जिप्सी गौसी मानापूर शिवारात उलटली. यात एका युवकाचा मृत्यू झाला तर काही जण किरकोळ जखमी झाले. यश राजू राहाटे (२३) रा.गोपालनगर, नागपूर असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यशचे वडील राजू रहाटे नागपूर महापालिकेच्या झोपडपट्टी विकास प्राधिकरण (एसआरए) विभागात अभियंता आहेत.

प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी रात्री नागपूर येथील ५ युवक आणि २ युवती जिप्सी क्रमांक एम.एच.४०/बी.ई.०००९ ने वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाबा येथे पार्टी करण्यासाठी (जेवणासाठी) गेले होते. येथून परत येत असताना गौसी मानापूर शिवारात चालकाचे जिप्सीवरील नियंत्रण सुटले. यात यश रहाटे हा गंभीर जखमी झाला. त्याला वर्धा रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात डॉक्टरांनी तपासअंती त्याला मृत घोषित केले. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीनंतर यशच्या पार्थिवावर शनिवारी अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले. यात अविनाश अय्यर (२४), विनायक नगर, आनंद गायधने (२४) रा. गोपाल नगर, अंकित तुपकर (२४) रा.वर्धमाननगर, हर्षल ठवरे (२४) रा. मानेवाडा आणि दोन युवतींचा समावेश आहे. त्यांना नजीकच्या विवेकानंद हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हर्षल ठवरे हा जिप्सी चालवित होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात अरविंद घिये करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू