लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (हिंगणा) : वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाब्यावर पार्टी करायला गेलेल्या युवक-युवतींची जिप्सी गौसी मानापूर शिवारात उलटली. यात एका युवकाचा मृत्यू झाला तर काही जण किरकोळ जखमी झाले. यश राजू राहाटे (२३) रा.गोपालनगर, नागपूर असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यशचे वडील राजू रहाटे नागपूर महापालिकेच्या झोपडपट्टी विकास प्राधिकरण (एसआरए) विभागात अभियंता आहेत.
जेवणाची पार्टी जीवावर बेतली : भरधाव जिप्सी उलटून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 19:45 IST
वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाब्यावर पार्टी करायला गेलेल्या युवक-युवतींची जिप्सी गौसी मानापूर शिवारात उलटली. यात एका युवकाचा मृत्यू झाला तर काही जण किरकोळ जखमी झाले.
जेवणाची पार्टी जीवावर बेतली : भरधाव जिप्सी उलटून एक ठार
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गौसी मानापूर शिवारातील घटना