शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळ गॅस दुर्घटनेच्या नायकाला 'दहशतवादी' ठरवण्याची धमकी; अपमानाने ज्येष्ठ वकिलाने स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:53 IST

मध्य प्रदेशात डिजिटल अरेस्टमध्ये अडकलेल्या एका वकिलाने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

Bhopal Digital Arrest Case: सायबर गुन्हेगारांनी दहशतवादी फंडिंगच्या खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी दिल्याने भोपाळमधील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ वकिलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवकुमार वर्मा असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ वकिलाचे नाव असून, जहांगीराबाद परिसरात सोमवारी रात्री ते त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. हा सगळा प्रकार घडला त्यावेळी वर्मा यांचे कुटुंबिय घरी नव्हते. डिजिटल अरेस्ट प्रकरणात एका वकिलाचा जीव गेल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे.

पोलिसांना घटनास्थळी शिवकुमार वर्मा यांनी लिहिलेली एक सुसाइड नोट मिळाली आहे. या नोटमधून त्यांनी आत्महत्येमागील कारण आणि आपली व्यथा सांगितली. "मी माझ्या स्वेच्छेने आत्महत्या करत आहे. कारण, कोणीतरी माझ्या नावाचा वापर करून एका बनावट एचडीएफसी बँक खात्यातून पहलगाम येथील दहशतवादी आसिफला पैसे पुरवले. माझ्यावर देशद्रोही असल्याचा ठपका लागेल, हे मी सहन करू शकत नाही," असा उल्लेख वर्मा यांनी सुसाइड नोटमध्ये केला आहे. या धमक्यांमुळे आणि  देशद्रोहाचा आरोप लागण्याच्या भीतीने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

या घटनेच्या वेळी वर्मा यांची पत्नी आणि मुलगी दिल्लीत होत्या, तर मुलगा पुणे येथे नोकरी करतो. पत्नीने फोन केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, म्हणून त्यांनी भाडेकरूला तपासणी करण्यास सांगितले. भाडेकरूने खिडकीतून पाहिले असता वर्मा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भोपाळ पोलिसांनी सांगितले की, सायबर गुन्हेगाराने स्वतःला वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून वर्मा यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये त्वरित अटक करण्याची धमकी दिली होती. वर्मा यांना त्यांच्या नावावर उघडलेल्या बनावट बँक खात्यातून दहशतवादी फंडिंग झाल्याचे सांगून त्यांना देशद्रोही ठरवण्याची धमकी दिली. भोपाळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आला असून, तपास सुरू आहे. सुसाइड नोटमध्ये बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाचा उल्लेख आहे. पोलिसांनी तातडीने सर्व तांत्रिक पुरावे गोळा करायला सुरुवात केली असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल.

शिवकुमार यांची समाजसेवेची पार्श्वभूमी

शिवकुमार वर्मा यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये त्यांच्या समाजकार्याची आठवण करून दिली आहे. त्यांनी सांगितले की, १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेदरम्यान त्यांनी शेकडो पीडितांवर अंत्यसंस्कार केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. तसेच, त्यांनी सुमारे ५० वेळा रक्तदान करून अनेक लोकांचे जीव वाचवले होते. आयुष्यभर समाजसेवा केलेल्या व्यक्तीला अशाप्रकारे देशद्रोही ठरवण्याची धमकी मिळाल्याने त्यांना तो अपमान असह्य झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhopal Gas Tragedy Activist Ends Life After Terrorist Tag Threat

Web Summary : Threatened with terror financing charges, a Bhopal lawyer committed suicide. He feared being labeled a traitor after a fake account was linked to terrorism. A suicide note detailed his distress and social work. Police are investigating the cybercrime.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश