७८ वर्षीय निवृत्त व्यवस्थापकाची डिजिटल अटक अन् अडीच लाख रुपये उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 17:26 IST2025-02-06T17:26:26+5:302025-02-06T17:26:55+5:30

गेल्या महिन्यात तक्रारदाराला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्याने फोन केला.

Digital arrest of 78-year-old retired manager, extortion of Rs 2.5 lakh in mumbai | ७८ वर्षीय निवृत्त व्यवस्थापकाची डिजिटल अटक अन् अडीच लाख रुपये उकळले

७८ वर्षीय निवृत्त व्यवस्थापकाची डिजिटल अटक अन् अडीच लाख रुपये उकळले

मुंबई : बोरीवलीत राहणाऱ्या एका बहुराष्ट्रीय बँकेच्या ७८ वर्षीय निवृत्त व्यवस्थापकाची डिजिटल अटकेच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी दोन लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

गेल्या महिन्यात तक्रारदाराला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्याने फोन केला. नंतर त्याने कॉल अंधेरी गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्यास ट्रान्सफर केला. त्याने तक्रारदारास ते मोठ्या हवाला रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप केला. 

याप्रकरणी अंधेरी गुन्हे शाखा तपास करत असून, त्याचा भाग म्हणून तुम्हाला नजरकैदेत ठेवण्याची गरज आहे, असे तक्रारदाराला सांगितले. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणे अशक्य झाले होते.

फोनला उत्तर नाही
तक्रारदाराच्या बँक तपशिलाची • पडताळणी करण्याच्या बहाण्याने त्यांना दोन लाख ३० हजार रुपये आरटीजीएसद्वारे बँक खात्यात हस्तांतरित करायला सांगितले. ते त्यांना परत करण्यात येतील, 3 असे आश्वासन दिले. मात्र, पैसे पाठवल्यानंतर त्यांनी आरोपींना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी फोनला उत्तर दिले नाही. कस्तुरबा मार्ग पोलिसांत त्यांनी तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला.

Web Title: Digital arrest of 78-year-old retired manager, extortion of Rs 2.5 lakh in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.