राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी याने माध्यमांसमोर अनेक मोठे खुलासे केले आहेत. सोनम रघुवंशीवर गंभीर आरोप करत विपिनने दावा केला की, सोनमने तिचा पती राजाच्या हत्येनंतर इंदूरला जाऊन तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहशी लग्न केलं आहे, त्यामुळेच दोन मंगळसूत्र सापडली.
सोनमच्या सामानाची झडती घेताना दोन मंगळसूत्र सापडल्याचा दावा विपिन रघुवंशीने केला. यापैकी एक मंगळसूत्र राजाच्या कुटुंबाने लग्नादरम्यान सोनमला दिलं होतं, परंतु दुसऱ्या मंगळसूत्राबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांना शंका आहे की दुसरं मंगळसूत्र सोनम आणि राजच्या लग्नाचा पुरावा असू शकतो.
सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
विपिनने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उच्च न्यायालयात आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात नेणार. आम्ही आमच्या भावाला न्याय मिळवून देणार. त्याने सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशीच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. विपिनच्या म्हणण्यानुसार, गोविंदने आधी त्याच्या घरी येऊन सांगितले होते की सोनम ही गुन्हेगार आहे आणि तिचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. पण आता गोविंद त्याच्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, जे आश्चर्यकारक आहे.
१६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
राजा रघुवंशीच्या मोठ्या भावाने सोमवारी सांगितलं होतं की, मुख्य आरोपी सोनमला लग्नादरम्यान राजाच्या कुटुंबाने तब्बल १६ लाख रुपयांचे दागिने भेट दिले होते. मेघालय पोलिसांनी रविवारी मध्य प्रदेशातील रतलाम येथून महत्त्वाचे पुरावे म्हणून काही दागिने, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केल्यानंतर विपिन रघुवंशी यांनी हा दावा केला. सोनम रघुवंशीला सासरच्यांनी लग्नात १६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तपासात एक नवीन वळण आलं.