'धूम स्टाईल'ने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना चार तासात केले जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस

By अजित मांडके | Updated: April 6, 2024 15:29 IST2024-04-06T15:29:35+5:302024-04-06T15:29:55+5:30

नाजीबुल मुस्ताक अहमद शेख (२३) आणि परवेज अन्वर हुसेन (24) अशी दोघांची नावे

'Dhoom Style' jailed two mobile phone thieves in four hours, three crimes were revealed | 'धूम स्टाईल'ने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना चार तासात केले जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस

'धूम स्टाईल'ने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना चार तासात केले जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: धूम स्टाईलने महिलेचा मोबाईल फोन हिसकावून पळ काढणाऱ्या नाजीबुल मुस्ताक अहमद शेख (२३) आणि परवेज अन्वर हुसेन (24) या दुकलीला अवघ्या चार तासात बेड्या घालण्यात कळवा पोलिसांना यश आले असून मागील दोन दिवसांमध्ये मोबाईल्स स्नॅचिंग तसेच चैन स्नॅचिंगचे व मोटासायकलस चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ते दोघे मूळचे पश्चिम बंगाल असून अशा प्रकारचे आतापर्यंत किती गुन्हे त्यांनी केलेले आहेत याचा तपास कळवा पोलीस करत आहेत.

कळवा पूर्व रेल्वे स्टेशन मफतलाल तलाव येथून एक महिला पायी चालत,खारेगाव नाक्याच्या दिशेने जात असताना तिचे पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने हातातील मोबाईल खेचून खारेगावच्या दिशेने पळून गेला.याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर कळवा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या चार तासांमध्ये त्या दुकलीला अटक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे करीत आहेत.

Web Title: 'Dhoom Style' jailed two mobile phone thieves in four hours, three crimes were revealed