धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 11:14 IST2023-01-11T11:13:38+5:302023-01-11T11:14:55+5:30
काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शाळेला धमकीचा फोन आला होता.

धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी, गुन्हा दाखल
मुंबई: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बची धमकी दिल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५(१) (बी) आणि ५०६ अंतर्गत बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शाळेला धमकीचा फोन आला होता. सदर कॉलरची ओळख पटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.