फसवणुकीप्रकरणी विकासकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 12:28 AM2020-11-05T00:28:22+5:302020-11-05T00:28:39+5:30

Crime News : संतोषकुमार सिंग (५३) असे आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २ने अटक केलेल्या विकासकाचे नाव आहे.

Developer arrested for fraud | फसवणुकीप्रकरणी विकासकाला अटक

फसवणुकीप्रकरणी विकासकाला अटक

googlenewsNext

नवी मुंबई : गृहप्रकल्पात घरखरेदीसाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन प्रत्यक्षात प्रकल्प न उभारता, फसणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला मंगळवारी अटक केली. गेल्या पाच वर्षांपासून तो पोलिसांना चकवा  देत होता. त्याच्या विरोधात ६४ जणांची तक्रार असून, पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
संतोषकुमार सिंग (५३) असे आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २ने अटक केलेल्या विकासकाचे नाव आहे. त्याने तळेगाव, खालापूर येथे कृष्णा कॉम्प्लेक्स या प्रस्तावित गृहप्रकल्पाची जाहिरात करून ग्राहकांचे पैसे घेतले होते. मात्र, २०१२ ते २०१५दरम्यान त्या जागेवर कसलेच बांधकाम केले नव्हते. यामुळे नागरिकांनी  पैसे परत मागितले असता, त्याने पोबारा केला होता. त्यानुसार, ६४ ग्राहकांची त्याने ६४ लाखांची फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी शेखर पाटील, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २चे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांचे पथक तपास करत होते. यावेळी सिंग हा पनवेल परिसरातच असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाल्यावर सापळा रचून त्याला अटक केली. 

Web Title: Developer arrested for fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.