गणेशोत्सव मंडपाजवळून हळू जाण्यास सांगितल्याने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 06:34 IST2018-09-23T06:34:28+5:302018-09-23T06:34:45+5:30

गणेशोत्सव मंडपासमोवरुन मोटारसायकल हळू चालविण्यास सांगणाऱ्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्याची घटना शुक्रवारी धारावीतील हिंदु सोनापूर रोडवर घडली.

 Desperate to go slow on Ganesh Festival | गणेशोत्सव मंडपाजवळून हळू जाण्यास सांगितल्याने हत्या

गणेशोत्सव मंडपाजवळून हळू जाण्यास सांगितल्याने हत्या

मुंबई - गणेशोत्सव मंडपासमोवरुन मोटारसायकल हळू चालविण्यास सांगणाऱ्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्याची घटना शुक्रवारी धारावीतील हिंदु सोनापूर रोडवर घडली. विनोद गणेश देवेंद्र (वय २९) असे मृत झालेल्याचे नाव असून याप्रकरणी नागेश कोंडम व शशी शेरखाने यांना धारावी पोलिसांनी अटक केली आहे.

धारावीतील एका हॉटेलमध्ये स्वयंपाक्याचे (कुक) काम करणारा विनोद देवेंद्र हा भाऊ सुरेशसोबत शुक्रवारी सायंकाळी गणपती व देखावे पहाण्यासाठी गेला होता. कामराज युथ असोसिएशनच्या सार्वजनिक मंडपाजवळून जात असताना तेथून दोघेजण मोटारसायकलीवरुन भरधाव वेगाने जात होते.

विनोदने त्यांना हटकून शिस्तीत जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडून दोघांनी त्याला पकडून लाथा-बुक्यांनी मारहाण केली. गुप्तांगावर मार बसल्याने देवेंद्र जागीच खाली पडल्याने दोघांनी पलायन केले. विनोदला बेशुद्धावस्थेत नजीकच्या रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत मिळालेल्या वर्णनावरुन शोध घेत नागेश व शशीला अटक केली.

Web Title:  Desperate to go slow on Ganesh Festival