जेलमध्ये जाण्याची होती हौस; त्यानं पोलिसांना कॉल करून दिली थेट पंतप्रधानांना मारण्याची धमकी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 14:46 IST2021-06-04T13:20:45+5:302021-06-04T14:46:37+5:30

Crime News : जेलमधील आत जाण्यासाठी त्याने हा फोन केला असल्याचे प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले.

Desire had to go to jail; He called the police and threatened to kill the Prime Minister...and | जेलमध्ये जाण्याची होती हौस; त्यानं पोलिसांना कॉल करून दिली थेट पंतप्रधानांना मारण्याची धमकी अन्...

जेलमध्ये जाण्याची होती हौस; त्यानं पोलिसांना कॉल करून दिली थेट पंतप्रधानांना मारण्याची धमकी अन्...

ठळक मुद्दे आरोपीची मानसिक प्रकृती ठीक नसून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यासाठी फोन कॉल करणार्‍या तरूणाला पोलिसांनीअटक केली आहे. आरोपी सलमानला खजुरी खास पोलिस ठाण्याने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री २२ वर्षीय सलमानने पोलिसांना कॉल करून पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आरोपीची चौकशी करत आहेत. आरोपीने फोन करून म्हटले होते की, "मला मोदींना मारायचे आहे". आरोपी जामिनावर सुडून तुरूंगातून बाहेर आल्याचे पोलिसांना कळले आहे. त्याच्यावर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत. जेलमधील आत जाण्यासाठी त्याने हा फोन केला असल्याचे प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले. आरोपीकडे पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यावर्षी जानेवारीमध्येही दिल्लीतील एका व्यक्तीने पोलिसांना बोलावून पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पंतप्रधानांना मारण्यासाठी 30 कोटीची सुपारी देईन असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले होते. हा कॉल करणार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सांगितले होते की, आरोपीचे नाव पिंटू सिंह असून त्याचे वय 30 वर्षे आहे. पिंटू हा सुतारकाम  करतो आणि दिल्लीतील सागरपूर भागात राहतो. आरोपीने दारूच्या नशेत पोलिसांना धमकी देणारा फोन केला होता.  आरोपीची मानसिक प्रकृती ठीक नसून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

पत्नीनेच केला पतीच्या गैरकृत्याचा पर्दाफाश; हायप्रोफाईल सोसायटीत सापडले बोगस वोटिंग कार्ड  

 

Web Title: Desire had to go to jail; He called the police and threatened to kill the Prime Minister...and

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.