शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डेरा प्रमुख राम रहीमला पॅरोल, 1 महिन्यासाठी जेलबाहेर; 'येथे' असणार ठिकाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 18:07 IST

Dera Chief Ram rahim on parole :पॅरोलच्या कालावधीत तो उत्तर प्रदेशतील बागपत आश्रमात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रोहतक :  हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या गुरमीत राम रहीमला तुरुंग प्रशासनाने पॅरोल मंजूर केला आहे. शुक्रवारी सकाळी राम रहीमला तुरुंगातून बाहेर आणण्यात आले असून कडेकोट बंदोबस्तात राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले आहे. पॅरोलच्या कालावधीत तो उत्तर प्रदेशतील बागपत आश्रमात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बागपतच्या बर्नावा गावात हा आश्रम असून राम रहीमचा कॅम्प असेल. हरियाणा सरकारने राम रहीमला एका महिन्यासाठी पॅरोल मंजूर केला आहे.याआधी हरियाणा सरकारने फेब्रुवारीमध्ये राम रहीमला २१ दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यादरम्यान सरकारने राम रहीमच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याला Z+ सुरक्षा प्रदान केली होती. सुट्टीच्या काळात राम रहीम बहुतेक वेळ त्याच्या गुरुग्राम आश्रमात राहिला.राम रहीमला 25 ऑगस्ट 2017 रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने दोन साध्वींच्या लैंगिक छळ प्रकरणी शिक्षा सुनावली होती. पंचकुलातील हिंसाचारानंतर राम रहीमची रवानगी सुनारिया तुरुंगात करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. यानंतर पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणातही त्याला शिक्षा झाली होती.राम रहीम अनेकदा तुरुंगातून बाहेर आलाआतापर्यंत राम रहीम अनेकवेळा तुरुंगातून बाहेर आला आहे. गेल्या वर्षी 12 मे 2021 रोजी डेरा प्रमुखाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान राम रहीमला ४८ तासांचा पॅरोल मिळाला होता. तो गुरुग्राममध्ये आपल्या आजारी आईला भेटायला गेला होता. यानंतर, 3 जून 2021 रोजी, PGIMS पुन्हा तपासणीसाठी आणण्यात आले. तसेच ६ जून रोजी त्यांना उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता मेडिसिटीमध्ये दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :jailतुरुंगHaryanaहरयाणाPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ