लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच तरुणावर हद्दपारीची कारवाई 

By Ajay.patil | Updated: April 19, 2023 15:52 IST2023-04-19T15:30:04+5:302023-04-19T15:52:13+5:30

संबधित युवकावर आधी असलेल्या विविध गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून आलेल्या विनंतीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Deportation action on the young man even before he got married | लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच तरुणावर हद्दपारीची कारवाई 

लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच तरुणावर हद्दपारीची कारवाई 

जळगाव : घरात लग्नाची धामधुम सुरु, त्यात लग्नाच्या पत्रिका छापून आता लग्नघटीकेची वाट पाहत असलेल्या तरुणावर अमळनेर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांसाठी हद्दपारीचे कारवाईचे आदेश काढले आहेत. संबधित युवकावर आधी असलेल्या विविध गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून आलेल्या विनंतीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

चोपडा येथील सानेगुरुजी वसाहत या भागातील रहिवाशी असलेल्या आकाश भोई असे कारवाई झालेल्या युवकाचे नाव आहे. आकाशचे ३ मे रोजी चोपडा येथे लग्न आहे. मात्र, लग्नाच्या काही दिवसांआधीच आकाशवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याने, लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच आकाशवर हद्दपारीची ‘हथकडी’ घालण्याची वेळ आली आहे. आकाशवर याआधी चोपडा पोलीस ठाण्यात विविध घटनांमध्ये गुन्हे दाखल आहेत. 

पोलिसांकडून याबाबत चौकशी केल्यानंतर अनेकवेळा या आरोपीला हजर राहण्याचे आदेश दिले, मात्र संबधित युवक हजर राहिला नाही. त्यात आगामी सण-उत्सव पाहता, व या युवकावर आधी असलेल्या गुन्ह्यांचे स्वरुप पाहता युवकाला धुळे, नंदुरबार व जळगाव या तीन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची मागणी पोलीसांकडून करण्यात आली होती. पोलीसांच्या अहवालाची माहिती घेतल्यानंतर अमळनेर प्रांतधिकारी सीमा अहिरे यांनी आकाश भोई याला चोपडा, नंदुरबार, जळगाव, यावल, शिरपुर, अमळनेर, धरणगाव या तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Web Title: Deportation action on the young man even before he got married