मुंबई: एका कुटूंबातील चार व्यक्तींसह अन्य दोघांना एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तृतीयपंथीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाखाली त्या व्यक्तीचा खून केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पीडित सुहेल अहमद शहा (३६) हा मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत बैगनवाडी येथे सापडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, दारूच्या नशेत असलेल्या सुहेलने नपुंसक, कैनाथला बोलावून लैंगिक शोषण केले. हे कळताच कैनाथचा मित्र शहनाज आणि शहनाजचा नवरा इरफान, त्यांची मुलगी आफरीन, मुलगा अवीश आणि अन्य दोन नातेवाईक आशु आणि समीर या ठिकाणी पोहोचले आणि सुहेलवर हल्ला केला. नंतर एकाने चाकूने त्यांच्यावर वार केलाआणि पळून गेला, असे पोलिसांनी सांगितले.
तृतीयपंथीकडे शरीरसुखाची केली मागणी, मुंबईत एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 21:57 IST
Murder Case : तृतीयपंथीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाखाली त्या व्यक्तीचा खून केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तृतीयपंथीकडे शरीरसुखाची केली मागणी, मुंबईत एकाची हत्या
ठळक मुद्देपीडित सुहेल अहमद शहा (३६) हा मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत बैगनवाडी येथे सापडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.