मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या दिल्लीच्या मुलाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 19:30 IST2018-07-14T19:29:38+5:302018-07-14T19:30:08+5:30
ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आकस्मित निधनाची नोंद

मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या दिल्लीच्या मुलाने केली आत्महत्या
मुंबई - सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून मास्टर्स करणाऱ्या शिवम दयाशंकर त्रिपाठी (वय - २०) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आकस्मित निधनाची नोंद करण्यात आली आहे.
ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश साळवी यांनी सांगितले की, काल सायंकाळी ५. ३० वाजताच्या सुमारास भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास लावून शिवमने आत्महत्या केली याबाबत त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्रांना घरी आल्यानंतर कळलं. त्यांनी पोलिसांना कळविल. पोलिसांना घटनास्थळी सुसाईट नोट सापडली नसून त्याच्या मित्रांनी दिलेल्या जबाबावरून शिवम नैराश्य किंवा मानसिक तणावात नव्हता असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याचे साळवी यांनी सांगितले. शिवम हा दिल्लीत राहणारा असून पुढील शिक्षणासाठी तो मुंबईत आला होता. गुवाहाटी टीसमध्ये शिक्षण पूर्ण केले असून मास्टर्स करण्यासाठी तो मुंबईत आला होता. मयत मुलाच्या आई - वडिलांना पोलिसांनी कळविले. ते मुंबईत आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.