Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 03:16 PM2020-03-05T15:16:17+5:302020-03-05T15:20:47+5:30

मी निर्दोष असून नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे ताहिरने सांगितले आहे. 

Delhi Violence: AAP suspended Tahir Hussain surrenders in court pda | Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण

Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण

Next
ठळक मुद्देताहिरने राउज अवेन्यू राउज एवेन्यू कोर्टात स्वत: ला न्यायव्यवस्थेसमोर सरेंडर केलं आहे. मी २४ तारखेला पोलिसांच्या हवाली घरी केले आणि निघालो होतो. ही संपूर्ण घटना २५ तारखेला घडली. 

नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचार प्रकरण आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन कोर्टात आत्मसमर्पण केले आहे.दिल्ली हिंसाचारादरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्माच्या हत्येचा ठपका ताहिरवर आहे. ताहिरने राउज अवेन्यू राउज एवेन्यू कोर्टात स्वत: ला न्यायव्यवस्थेसमोर सरेंडर केलं आहे. मी निर्दोष असून नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे ताहिरने सांगितले आहे. 

दिल्ली हिंसाचारात नाव पुढे आल्यानंतर आपच्या नगरसेवकाला निलंबित करण्यात आले. ताहिरने सांगितले की त्यांच्या वकीलांनी त्याला न्यायालयात सरेंडर होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याने हे निर्णय घेतला.


अंकितच्या हत्येच्या कटात माझा सहभाग नाही 

आयबी अधिकारी अंकित शर्माच्या हत्येप्रकरणी मला जबाबदार ठेवण्यात आले असल्याचे वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आले. ताहिर म्हणाला,माझ्यावर चुकीचे आरोप लावले जात आहेत. अंकितच्या हत्येबाबत ते म्हणाले, 'तपासानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल. मी त्यांच्या मृत्यूमुळे दुःखी झालो होतो. माझ्या कुटुंबीयांपैकी घटना घडली त्यावेळी तेथे कोनोही नव्हतं. मी २४ तारखेला पोलिसांच्या हवाली घरी केले आणि निघालो होतो. ही संपूर्ण घटना २५ तारखेला घडली. 

धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अ‍ॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेख

 

Delhi Violence : ताहिर हुसैनविरोधात गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक

 

हुसैनविरोधात दयालपूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. हुसैनच्या घरावर छापा पोलिसांनी टाकला असून दिल्ली फॉरेन्सिक सायन्स लॅबचे पुरावे गोळा केले आहेत. 

Read in English

Web Title: Delhi Violence: AAP suspended Tahir Hussain surrenders in court pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.