गर्लफ्रेन्डला इम्प्रेस करण्यासाठी तरूण बनला नकली पोलीस इन्स्पेक्टर, असा झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 18:06 IST2021-07-24T18:04:58+5:302021-07-24T18:06:51+5:30
द्वारका पोलिसांनी सांगितलं की, एक व्यक्ती पोलिसांच्या ड्रेसमध्ये लोकांना धमकावत आहे. त्यानंतर एका हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

गर्लफ्रेन्डला इम्प्रेस करण्यासाठी तरूण बनला नकली पोलीस इन्स्पेक्टर, असा झाला भांडाफोड
दिल्ली पोलिसांनी एक नकली पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक एअर पिस्तुल ताब्यात घेतली आहे. पोलिसांना आरोपीकडे पोलिसांचे दोन ड्रेस, दोन नकली आयकार्ड सापडले आहेत. आरोपीने सांगितलं की, तो त्याच्या गर्लफ्रेन्डसाठी नकली पोलीस इन्स्पेक्टर बनला होता.
द्वारका पोलिसांनी सांगितलं की, एक व्यक्ती पोलिसांच्या ड्रेसमध्ये लोकांना धमकावत आहे. त्यानंतर एका हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी पोलिसाच्या ड्रेसमध्ये हॉटेलमध्ये चेकइन करण्यासाठी आला होता. हॉटेल मालकाला त्या व्यक्तीवर संशय आला आणि त्याने लगेच पोलिसांना सूचना दिली.
द्वारका पोलिसांनी हॉटेलमध्ये छापेमारी केली आणि रूममधून अजय नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. अजयकडून उत्तर प्रदेश पोलिसांचे दोन ड्रेस, दोन आयडी आणि एक नकली बंदूक ताब्यात घेतली. आरोपी मथुराचा राहणारा आहे. पोलिसांनी चौकशी केल्यावर तो पोस्टिंग आणि पोलिसांसंबंधी कोणताही माहिती देऊ शकला नाही.
चौकशीत अजयने खुलासा केला की, तो दिल्लीच्या मोहम्मदपूर भागात पाणी सप्लाय करण्याचं काम करत होता. यादरम्यान त्याची भेट एका तरूणीसोबत झाली आणि आपल्या गर्लफ्रेन्डला इम्प्रेस करण्यासाठी स्वत:ला उत्तर प्रदेश पोलिसात अधिकारी असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर अजयने गर्लफ्रेन्डला इम्प्रेस करण्यासाठी पोलिसांची वर्दी खरेदी केली आणि नकली पोलीस अधिकारी बनला.