शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 15:24 IST

चोरीच्या घटनेच्या तपासासाठी जात असताना घडला धक्कादायक प्रकार.

नवी दिल्ली: दिल्लीच्या नांगलोई भागात हिट-अँड-रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, त्यात साध्या वेशात कॉन्स्टेबल आपल्या दुचाकीवरुन जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याचे दिसत आहे. ही घटना रविवारी पहाटे घडली असून, संदीप असे या मृत कॉन्स्टेबलचे नाव आहे.

चोरीच्या तपासासाठी जात असताना घटनामिळालेल्या माहितीनुसार, परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत, त्याचा शोध घेण्यासाठी कॉन्स्टेबल संदीप साध्या ड्रेसमध्ये कर्तव्य बजावत होते. ते दुचाकीवर जात असताना त्यांना एक संशयास्पद वॅगनआर कार दिसली. त्यांनी ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्याचा इशारा केला, मात्र त्याने गाडी थांबवली नाही. यानंतर संदीप यांनी आपल्या दुचाकीवर कारचा पाठलाग करुन ओव्हरटेक केले.

यावेळी वॅगनआरच्या चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि पाठीमागून संदीपच्या दुचाकीला धडक देऊन सुमारे 10 मीटरपर्यंत फरफटत नेले. यावेळी समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारलाही वॅगनआरची धडक बसली. दोन गाड्यांच्या मध्ये अडकल्याने संदीप गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ प्रथमोपचारासाटी सोनिया रुग्णालयात आणि तेथून पुढील उपचारासाठी पश्चिम विहार येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मीडियाला संबोधित करताना डीसीपी जिमी चिराम म्हणाले की, वॅगनआरमध्ये दोघे प्रवास करत होते. घटनेनंतर त्यांनी पळ काढला. या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. दोघांची ओळख पटली असून, घटनेतील वॅगनआर कारही जप्त करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी हा रोड रेजचा प्रकार असल्याचे दिसत असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसात तैनात असलेले संदीप हरियाणातील रोहतकचे रहिवासी होते. त्यांची 2018 साली दिल्ली पोलिसांत भरती झाली. 30 वर्षीय संदीप यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी आणि ५ वर्षांचा मुलगा आहे. संदीपच्या मृत्यूमुळे पत्नी व आईची अवस्था वाईट असून रडत आहे.

 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू