शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
3
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
4
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
5
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
6
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
7
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
8
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
9
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
10
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
11
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
12
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
13
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
14
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
15
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
16
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
17
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
18
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
19
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

शरीराचे सहा तुकडे, राजधानी दिल्लीत 'ISIS-स्टाईल' हत्या; आरोपींचा दहशतवाद्यांशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 5:45 PM

निष्पाप व्यक्तीचा खून करुन सहा तुकडे केले आणि व्हिडिओ परदेशात बसलेल्या आकांना पाठवला.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये एका व्यक्तीची ISIS स्टाईलने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांशी संबंधीत आरोपींनी दिल्लीतील व्यक्तीची हत्या करुन मृतदेहाचे सहा तुकडे केले. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या दोघांनी एका व्यक्तीचा शिरच्छेद केल्याची कबुली दिली होती, तसेच त्यांच्या आकांना हत्येचा व्हिडिओही पाठवला. 

उत्तर दिल्लीतील भालस्वा डेअरीमध्ये सहा तुकडे केलेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणात पोलिसांना दहशतवादी संबंध आढळून आला. यानंतर एटीएसकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही हत्या करू शकतो, असा पुरावा परदेशात बसलेल्या आकांना देण्यासाठी आरोपींनी 'ISIS स्टाईल'ने हत्या केली. आरोपी सोहेल पाकिस्तानातील आयएसआयशी संबंधित आहे, तर आरोपी जगजीत कॅनडात बसलेल्या अर्शदीप सिंग गिल या दहशतवाद्याशी संबंधित आहे.

असा झाला खूनाचा उलगडाएका गँगस्टर प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नौशादला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान संगनमताने एका व्यक्तीची हत्या केल्याची कबुली दिली. सोहेलचा साथीदार नौशादने एका अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन व्यक्तीला आमिष दाखवून निर्जण ठिकाणी नेले आणि तिथे त्याचे सहा तुकडे करुन अवयव भालस्वा डेअरी परिसरातील तलावात फेकले होते. पोलिसांनी शरीराचे पाच अवयव जप्त केले असून अजून एक जप्त करणे बाकी आहे.

दहशतवादी संबंध दिल्लीमध्ये आरोपी सोहेलची भेट 56 वर्षीय नौशादशी झाली. नौशादला 1990च्या दशकाच्या सुरुवातीला खुनाच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगातच सोहेलला कट्टरतावादाचे धडे दिले. 2013 मध्ये सोहेलची सुटका झाल्यानंतर नौशाद देखील तुरुंगातून बाहेर येण्यात यशस्वी झाला, परंतु 2020 मध्ये त्याला खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. नौशाद गेल्या वर्षी तुरुंगातून सुटल्यानंतर दोघे पुन्हा संपर्कात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेलने 2000 साली लाल किल्ल्यावरील हल्ल्यातील आरोपी मोहम्मद आरिफचीही तुरुंगात भेट घेतली होती. सोहेल सध्या पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) शी संबंधित आहे. तपास अधिकार्‍यांनी असेही सांगितले की, नौशादने 2018 मध्ये बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्यांतर्गत कॅनडास्थित अर्शदीप सिंग गिल उर्फ ​​अर्श डल्ला याच्याशी संबंध असलेल्या जगजित सिंग याचीही भेट घेतली.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीISISइसिसTerrorismदहशतवाद