शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिका झाली हैवान! 5 वीच्या विद्यार्थिनीला बेदम मारलं अन् पहिल्या मजल्यावरून खाली ढकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 14:59 IST

शाळेतील दोन शिक्षिकांच्या भांडणात एका पाचवीतल्या मुलीला आधी पेपर कटरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक शिक्षिका हैवान झाली आहे. शाळेतील दोन शिक्षिकांच्या भांडणात एका पाचवीतल्या मुलीला आधी पेपर कटरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरून फेकून दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर मुलीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या हिंदूराव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

डीबीजी रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांना शिक्षिकेने एका विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरून ढकल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, फिल्मिस्तानच्या मॉडल परिसरातील एका प्राथमिक शाळेत ही घटना घडली. यामध्ये पाचवीच्या विद्यार्थिनीला गीता देशवाल नावाच्या शिक्षिकेने पहिल्या मजल्यावरून ढकललं. तसेच त्याआधी तिला मारहाण देखील केली होती.

विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला हिंदूराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती दिली. तसेच शिक्षिकेला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. तसेच शिक्षिकेने तिचे केस कापण्याचा देखील प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. काहीही चूक केलेली नसताना असं केल्याचं सांगितलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

क्रूरतेचा कळस! प्रश्नाचं उत्तर न आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला जमिनीवर पाडलं, डोकंच फोडलं अन्...

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकाने एका क्षुल्लक कारणावरून सातवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याचं डोकं फुटलं असून डोक्याला अनेक टाके पडले आहेत. या घटनेनंतर तातडीने उपचारासाठी विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात आले आहे. पालकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित शिक्षकाविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थीSchoolशाळाdelhiदिल्ली