पतीने मित्राकडून घडवून आणला दुसऱ्या पत्नीवर रेप, मग केली हत्या; पहिल्या पत्नीलाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 11:37 IST2022-04-25T11:36:44+5:302022-04-25T11:37:26+5:30

Delhi Crime News : १८ एप्रिलला पोलिसांना सूचना मिळाली होती की नरेला इंडस्ट्रिअल एरियातील झुडपात एका ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

Delhi : Husband murder second wife with help of first wife, friend raped | पतीने मित्राकडून घडवून आणला दुसऱ्या पत्नीवर रेप, मग केली हत्या; पहिल्या पत्नीलाही अटक

पतीने मित्राकडून घडवून आणला दुसऱ्या पत्नीवर रेप, मग केली हत्या; पहिल्या पत्नीलाही अटक

Delhi Crime News : दिल्लीच्या नरेला इंडस्ट्रिअल एरिया एका महिलेच्या हत्येबाबत दिल्ली पोलिसांनी खळबळजनक खुलासा केलाय. पोलिसांनी मृत महिलेचा पती, त्याची पहिली पत्नी आणि आरोपीच्या एका मित्राला अटक केली आहे. पोलिसांनुसार, पतीने आपली पहिली पत्नी आणि मित्राच्या मदतीने दुसऱ्या पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली होती आणि तिचा मृतदेह नरेला इंडस्ट्रिअल एरियात फेकला होता.

१८ एप्रिलला पोलिसांना सूचना मिळाली होती की नरेला इंडस्ट्रिअल एरियातील झुडपात एका ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी चौकशी करून महिलेची ओळख पटवली. पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली तेव्हा समजलं की, १६ एप्रिलच्या रात्री ९ वाजता मृत महिला तिच्या पतीसोबत दिसली. दोघेही बाजारात खरेदी करण्यासाठी जात होते.

दुसऱ्या दिवशी पती कारखान्यात गेला, पण तो नेहमीप्रमाणे सामान्य दिसत नव्हता. जेव्हा त्याच्या सहकाऱ्याने त्याला विचारलं तर तो म्हणाला की, कौटुंबिक समस्या आहे. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, आरोपी पतीला दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलं आहेत. तर दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा आहे.

मृत महिला आधी बिहारमध्ये राहत होती. पण आता ती पतीसोबत राहण्यासाठी दिल्लीला आली होती. यानंतर मृत महिला आणि तिच्या पतीमध्ये काही कारणावरून भांडण सुरू झालं. चौकशीतून समोर आलं की, मृत महिलेसोबत पतीच्या मित्राने आधी रेप केला आणि त्यानंतर तिच्या पतीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली.

पोलिसांनी ती आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना असंही समजलं आहे की, पहिल्या पत्नीचं दुसऱ्या पत्नीसोबत पटत नव्हतं. तिने महिलेला संपवण्याचा प्लान केला होता. यात आरोपी पतीने आपल्या मित्रालाही सहभागी करून घेतलं. मित्राने महिलेवर रेप केला आणि तिचा मृतदेह फेकला.
 

Web Title: Delhi : Husband murder second wife with help of first wife, friend raped