शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हत्या की आत्महत्या? एकाच घरात सापडले 4 जणांचे मृतदेह; पती लटकलेल्या अवस्थेत तर मुलं...; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 13:35 IST

Crime News : रोहिणी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - देशभरात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशाच एका भयंकर घटनेने दिल्ली हादरलं आहे. दिल्लीच्या रोहिणी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, एकाचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह खोलीत बेडवर पडलेले सापडले आहेत. पतीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलांची हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली असा संशय सध्या व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरचा दरवाजा आतून बंद करण्यात आलेला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घराचा दरवाजा उघडताच सर्वांना धक्का बसला आहे. धीरज यादव असं मृताचं नाव असून त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. धीरज 31 वर्षांचा होता. तसेच डीटीसीमध्ये बसचालक म्हणून कार्यरत होता. 

धीरज यांच्या पत्नीचं नाव आरती आहे. ती 28 वर्षांची होती. तर मुलगा हितेन सहा वर्षांचा आणि अथर्व हा अवघ्या तीन वर्षांचा होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशमध्ये एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. एका बलात्कार पीडित तरुणीला मदत करण्याऐवजी तिच्याच नातेवाईकांनी तिला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीला बेदम मारहाण करून तिची बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबत धिंड काढण्यात आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. 

लज्जास्पद! बलात्कार पीडितेला नातेवाईकांकडून बेदम मारहाण; आरोपीसोबत दोरखंडाने बांधून काढली धिंड

मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. एका कुटुंबाने बलात्कार पीडित मुलीला आधार देण्याऐवजी बेदम मारहाण केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला आणि पीडितेला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केली आहे. तसेच पीडित मुलीची आरोपीसोबत धिंड देखील काढली आहे. संबंधित आरोपी हा पीडित मुलीच्या ओळखीचा असून तिच्या नात्यातील आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. पोलिसांनी याची दखल घेतली असून आरोपी आणि पीडित युवतीच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस