शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत अजून एक 'कंझावला कांड', टॅक्सी चालकाला 200 मीटर फरफटत नेले; जागीच मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 15:12 IST

राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा 'कंझावाला'सारखी घटना घडली आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा 'कंझावाला'सारखी घटना घडली आहे. एका व्यक्तीला मारहाण केल्यानंतर कार चालकाने 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. या वेदनादायक आणि हृदयद्रावक घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या कारस्वाराने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यानंतर पोलिसांनी तपास केला असता, हा व्हिडीओ NH8 च्या सर्व्हिस रोडचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला, त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील वसंत कुंज उत्तर पोलीस स्टेशन परिसरातील महिपालपूरजवळील NH 8 सर्व्हिस लाइनवर त्या व्यक्तीला सुमारे 200 मीटरपर्यंत ओढत नेले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना काल रात्री 11.30 च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांना NH 8 सेवा मार्गावर एक मृतदेह पडलेला आढळला. बिजेंद्र असे मृताचे नाव असून तो फरिदाबादचा रहिवासी आहे. बिजेंद्र व्यवसायाने टॅक्सी चालक होता. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी बिजेंद्रची कार लुटण्याचा प्रयत्न केला, त्याला विरोध केला असताना, बिजेंद्रला मारहाण करत ओढत नेले. पोलीस या प्रकरणाचा विविद अँगलने तपास करत आहेत. आरोपींना अटक झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

काय आहे कंझावाला घटना?गेल्या वर्षी 31 डिसेंबरच्या रात्री एका तरुणीचा अशाच प्रकारचे मृत्यू झाला होता. एकार कारने त्या तरुणीला धडक मारली अन् नंतर तब्बल 12 किलोमीटर रस्त्यावर फरफटत नेले. या घटनेत मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला, तिच्या शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. पोलिसांनी कारवाई करत आरोपींना तेव्हाच अटक केली.

 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस