'तो' क्षुल्लक वाद ठरला जीवघेणा; ४०० रुपयांवरून तरुणांनी केली कॅब ड्रायव्हरची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 10:42 IST2024-12-21T10:42:31+5:302024-12-21T10:42:45+5:30

दिल्लीतील सोनिया विहार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे.

delhi cab driver stabbedto death following dispute over rs 400 fare | 'तो' क्षुल्लक वाद ठरला जीवघेणा; ४०० रुपयांवरून तरुणांनी केली कॅब ड्रायव्हरची हत्या

'तो' क्षुल्लक वाद ठरला जीवघेणा; ४०० रुपयांवरून तरुणांनी केली कॅब ड्रायव्हरची हत्या

दिल्लीतील सोनिया विहार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. ४०० रुपयांच्या भाड्यावरून झालेल्या भांडणानंतर एका २६ वर्षीय कॅब ड्रायव्हरची प्रवाशी आणि त्याच्या मित्रांनी हत्या केली. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. ही घटना मध्यरात्री घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

रॅपिडोसाठी टॅक्सी चालवणारा संदीप हा सोनिया विहारजवळ रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळला. संदीपने पोलिसांना सांगितलं की, तो नोएडा येथून दीपांशू उर्फ ​​आशु, राहुल आणि मयंक या तीन प्रवाशांना घेऊन आला होता. सोनिया विहारमधील पुसट २ ला पोहोचल्यानंतर राइड संपली. आरोपींनी ४०० रुपये भाडं द्यायचं नसल्याचं सांगून संदीपला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीदरम्यान निखिल आणि एका अल्पवयीन मुलाने संदीपच्या डोक्यात आणि पोटात वार केले. त्यानंतर उपचारादरम्यान संदीपचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस उपायुक्त (ईशान्य) राकेश पावरिया यांनी सांगितलं की, तपासादरम्यान घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. अधिक चौकशी केली असता, ही कॅब प्रतिकच्या नावाने बुक केल्याचं आढळून आलं.

पावरिया यांनी सांगितलं की, प्रतिक १७ डिसेंबर रोजी दीपांशू, राहुल, मयंक, निखिल आणि एका अल्पवयीन मुलाला कोंडली येथे भेटला. त्यानंतर त्याने दीपांशू, राहुल आणि मयंक यांच्यासाठी कॅब बुक केली. दीपांशूला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे आणि इतर मित्रांचा शोध सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: delhi cab driver stabbedto death following dispute over rs 400 fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.