शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

VIDEO: ५ सशस्त्र रक्षकांचा पहारा असताना 'तो' पीपीई किटमध्ये आला अन् १३ कोटींचे दागिने लुटून गेला

By कुणाल गवाणकर | Published: January 21, 2021 1:23 PM

१३ कोटींचे दागिने घेऊन चोरटा पसार; पोलिसांकडून २४ तासांत अटक

दिल्ली: एका ज्वेलर्समधून कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरुन पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शेख नूर असं आरोपीचं नाव असून त्यानं दिल्लीतल्या कालाकाजी परिसरातील अंजली ज्वेलर्समध्ये चोरी केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून १३ कोटी रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. मोहम्मदनं ज्वेलर्समधून तब्बल २५ किलो सोनं चोरुन पोबारा केला होता. मोहम्मद पीपीई किट घालून ज्लेवर्समध्ये शिरला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शेख नूर दुसऱ्या इमारतीवरून आत शिरला होता. शोरूमच्या मागे-पुढे ५ सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र तरीही यातल्या कोणालाही चोर आल्याचा सुगावा लागला नाही. चोरानं दागिने बॅगेत भरले आणि ती बॅग रिक्षातून नेली. फिल्मी स्टाईलनं करण्यात आलेली ही चोरी यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी चोरी आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हुबळीचा रहिवासी आहे. तो कालकाजीमध्ये इलेक्ट्रिशन म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आग्नेय दिल्लीतल्या कालाकाजी परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अंजली ज्वेलर्समध्ये त्यानं चोरी केली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चोराला पकडण्यात यश मिळवलं.अंजली ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ माजली. आसपास राहणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली. दुकानाच्या मागे-पुढे सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात असूनही त्यांना कोणतीही चाहूल लागली नाही. चोरानं अतिशय चलाखीनं चोरी केली आणि दोरीच्या मदतीनं पसार झाला. ही घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

टॅग्स :Thiefचोर