फरिदाबाद टेरर मॉड्यूल आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटाच्या चौकशीत एक नवीन नाव समोर आलं आहे ते म्हणजे डॉ. निसार उल हसन. काश्मीरच्या या डॉक्टरला नोव्हेंबर २०२३ मध्ये "देशविरोधी कारवाया" केल्याच्या आरोपावरून सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आलं होतं. तो श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयात मेडिसिन विभागात असिस्टेंट प्रोफेसर होता.
डॉ. निसार हा सोपोरमधील अचबल गावातील आहे, जो एकेकाळी दहशतवादी कारवायांसाठी ओळखला जात होता. त्याने जीएमसी श्रीनगरमधून एमबीबीएस आणि एसकेआयएमएसमधून एमडी पदवी प्राप्त केली आणि डॉक्टर्स असोसिएशन ऑफ काश्मीर (डीएके) चा अध्यक्ष म्हणून काम केलं. त्याची कारकीर्द वादात अडकली आहे - २०१३ मध्ये बनावट औषध घोटाळ्यावरून संप पुकारणं, २०१४ मध्ये कर्मचाऱ्यांना कर न भरण्याचं आणि निवडणूक कर्तव्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करणं. या सर्व गोष्टींमुळे त्याला अनेक वेळा निलंबित करण्यात आलं.
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
२०२३ मध्ये त्याला पुन्हा काढून टाकण्यात आलं आणि एलजी मनोज सिन्हा यांनी त्याला "टिकिंग टाईम बॉम्ब" असंही म्हटलं. तो आता तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे कारण अलिकडच्या काळात तो हरियाणातील अल-फलाह विद्यापीठात जनरल मेडिसिनचा प्रोफेसर होता. लाल किल्ला स्फोटाचा मास्टरमाईंड मानला जाणारा डॉ. उमर उन-नबी एक वर्ष त्याच्या हाताखाली ज्युनियर डॉक्टर होता.
व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
डॉ. निसारची पत्नी डॉ. सुरैयाने दिलेल्या माहितीनुसार, निसार आणि उमरचे संबंध चांगले नव्हते. उमर अनेकदा गायब असायचा, रुग्णांना पाहायचा नाही. वारंवार इशारा दिल्यानंतर त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये पाठवलं. तिने असंही म्हटलं की निसार फरार झालेला नाही, विद्यापीठातील इतर अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांप्रमाणे त्याला एनआयएच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दिल्ली स्फोटाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
Web Summary : Dr. Nisar, sacked for anti-national activities, is under scrutiny after the Delhi blast. He supervised Dr. Umar, the blast's alleged mastermind. His wife claims Nisar isn't absconding but detained for NIA questioning. Investigation ongoing.
Web Summary : दिल्ली विस्फोट के बाद, देशविरोधी गतिविधियों के आरोप में बर्खास्त डॉक्टर निसार जांच के दायरे में हैं। उन्होंने उमर का मार्गदर्शन किया, जिसे विस्फोट का मास्टरमाइंड माना जा रहा है। पत्नी का दावा है कि निसार फरार नहीं है, एनआईए द्वारा पूछताछ के लिए हिरासत में है। जांच जारी है।