इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत एका महिला प्रवाशाकडून कोट्यवधी रुपयांचं सोनं, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि परदेशी चलन जप्त केलं आहे. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी टर्मिनल-३ वर हाँगकाँगहून विमान क्रमांक CX-695 ने आलेल्या एका महिला प्रवाशाला कस्टम्स अधिकाऱ्यांनी संशय आल्यानंतर अडवलं. या महिलेकडे अमेरिकन पासपोर्ट आहे.
संशयावरून महिलेच्या सामानाचं सर्वात आधी एक्स-रे स्क्रीनिंग करण्यात आलं आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार सविस्तर तपासणी करण्यात आली. या तपासणीत जे काही हाती लागलं त्याने अधिकारीही हैराण झाले. तपासादरम्यान महिलेकडे एक किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने, अनेक किलो चांदीची भांडी आणि अत्यंत महागडी घड्याळं आढळून आली.
महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तू
दागिने - १.२ किलोग्रॅम सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने.
चांदी - १० किलो चांदीची भांडी.
लक्झरी घड्याळं - रोलेक्स, बुल्गारी, चोपार्ड, कार्टियर यांसारखी महागडी ब्रँडेड घड्याळं.
विदेशी चलन - ९,०८४ अमेरिकन डॉलर, ६०५ युरो आणि २,५४० हाँगकाँग डॉलर.
जप्त केलेल्या सामानाची एकूण किंमत सुमारे ५.४२ कोटी इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. कस्टम विभागाच्या माहितीनुसार, हे सर्व सामान घोषित केलं गेलं नव्हतं, जे 'कस्टम्स ॲक्ट, १९६२' च्या तरतुदींचे उल्लंघन आहे. त्यामुळे हे सामान कलम ११० अंतर्गत जप्त करण्यात आलं. मात्र तपासणीत ५५२ ग्रॅम देशांतर्गत खरेदी केलेलं सोनं देखील आढळलं, जे जप्त न करता प्रवाशाला परत करण्यात आलं. संबंधित महिला प्रवाशाला कलम १०४ अंतर्गत अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Customs at Delhi's IGI Airport seized ₹5.42 crore worth of undeclared gold, silver, luxury watches, and foreign currency from a woman arriving from Hong Kong. The items were seized under the Customs Act, 1962, and the passenger was arrested.
Web Summary : दिल्ली के आईजीआई एयरपोर्ट पर कस्टम्स ने हांगकांग से आई एक महिला से 5.42 करोड़ रुपये का अघोषित सोना, चांदी, लग्जरी घड़ियां और विदेशी मुद्रा जब्त की। सीमा शुल्क अधिनियम, 1962 के तहत सामान जब्त किया गया और यात्री को गिरफ्तार कर लिया गया।