फोन टॅप करून डेटा नष्ट; २ वरिष्ठ पोलिसांना अटक, निलंबित डीएसपी राव यांच्याशी केले संगनमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 06:50 IST2024-03-25T05:24:42+5:302024-03-25T06:50:30+5:30
राव यांना गुप्तचर माहिती खोडल्याचा तसेच फोन टॅपिंग केल्याबद्दल अटक केली होती. चौकशीदरम्यान, दोन पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

फोन टॅप करून डेटा नष्ट; २ वरिष्ठ पोलिसांना अटक, निलंबित डीएसपी राव यांच्याशी केले संगनमत
हैदराबाद : फोन टॅप करून संगणक प्रणाली आणि अधिकृत डेटा नष्ट केल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अटक केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, अतिरिक्त डीसीपी थिरुपथण्णा आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक एन. भुजंगा राव यांना अटक करण्यात आल्याचे हैदराबाद पोलिसांनी सांगितले.
सदर पोलिस अधिकाऱ्यांनी पदांचा गैरवापर करून खासगी व्यक्तींवर बेकायदा नजर ठेवणे, या प्रकरणातील सहभाग लपवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करून पुरावे गायब केल्याचे गुन्हे दाखल केले.
दोन्ही अधिकाऱ्यांनी दिली गुन्ह्यांची कबुली
दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनुक्रमे विशेष गुप्तचर विभाग (एसआयबी) व गुप्तचर विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक
म्हणून काम केले. त्यांच्यावर निलंबित डीएसपी डी. प्रणीत राव यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप होता.
राव यांना गुप्तचर माहिती खोडल्याचा तसेच फोन टॅपिंग केल्याबद्दल अटक केली होती. चौकशीदरम्यान, दोन पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे.