जन्मदात्याचा आपल्या नऊ वर्षाच्या मुलीवरच बलात्कार ; जुन्नर तालुक्यातील नात्याला काळिमा फासणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 17:45 IST2020-12-21T17:17:01+5:302020-12-21T17:45:02+5:30

पीडित मुलगी घरात एकटीच खेळत होती.

Defamation incident in Junnar taluka; father rapes on nine-year-old girl | जन्मदात्याचा आपल्या नऊ वर्षाच्या मुलीवरच बलात्कार ; जुन्नर तालुक्यातील नात्याला काळिमा फासणारी घटना

जन्मदात्याचा आपल्या नऊ वर्षाच्या मुलीवरच बलात्कार ; जुन्नर तालुक्यातील नात्याला काळिमा फासणारी घटना

ओतूर : पिंपरी पेंढार येथे दुपारच्यावेळी घरात खेळत असलेल्या अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या पित्यानेच बलात्कार केल्याची लांच्छनास्पद व काळिमा फासणारी घटना घडली आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

ओतूर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर - कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता.जुन्नर) येथे पीडित मुलगी व तिचे कुटुंब राहते आहे. शनिवारी पीडित मुलगी घरात एकटीच खेळत होती. त्यावेळी आजूबाजूला कुणी नसल्याचा फायदा घेत मुलीच्या वडिलांनी हे दुष्कृत्य केले. या घटनेची माहिती समजताच पीडित मुलीच्या आईने तात्काळ ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास ओतूर पोलीस करत आहेत.

Web Title: Defamation incident in Junnar taluka; father rapes on nine-year-old girl